सातारा : मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 26 मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. या दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपुर्ण देशात विकास पर्व जनसंपर्क यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. या यात्रेत दोन वर्षामध्ये केलेल्या विकास कामांची माहिती देणारा रथ तयार करण्यात आला होता या रथाचे दि. 9 जून रोजी सातार्यात समर्थ मंदीर बोगदा येथे आगमन झाले या रथाचे स्वागत भारतीय जनता पार्टी, सातारा शहराच्या वतीने शहराध्यक्ष सुनिल काळेकर यांच्या हस्ते रथाला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले व परिसरात फटाकांच्या आतिषबाजी करण्यात आली.
भारतमाता की जय,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर युवा मोर्चा सातारा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील व रविंद्र पवार यांनी मोटार सायकल रॅलीने रथ यात्रा समर्थ मंदीर ते राजवाडा, गोलबाग येथे नेण्यात आली यावेळी सातार्यातील ठिकठिकाणी असलेल्या महापुरूषांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर दिपक पवार शहराध्यक्ष सुनिल काळेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच शहरातील मुख्य चौका चौकामध्ये सरकारच्या योजनांची माहिती भाजपा प्रदेश प्रवक्त्या मा. कांताबाई नलवडे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, दिपक पवार, जिल्हा सरचिटणीस विजय काटवटे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पवार, प्रचार व प्रसिध्दी प्रमुख रविंद्र भोसले शहर सरचिटणीस विकास गोसावी, जयदिप ठुसे, विठ्ठल बलशेटवार, चिटणीस रोहन आंबेकर, विद्याधर डुबल, शहर उपाध्यक्ष आप्पा कोरे, प्रदिप मोरे, मिलींद काकडे, विकास पर्व जनसंपर्क यात्रा यशस्वी करण्याकरिता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप मेळाट, अभिषेक साळुंखे, शहर उपाध्यक्ष अजय शिवदास, वैभव हादगे, भुषण गोरे, विकास राठोड, सरचिटणीस धनशाम इंगळे, अक्षय भोसले, अमोल कांबळे, राहुल अहिरे आदिंनी परिश्रम घेतले.