İstanbul escort bayan sivas escort samsun escort bayan sakarya escort Muğla escort Mersin escort Escort malatya Escort konya Kocaeli Escort Kayseri Escort izmir escort bayan hatay bayan escort antep Escort bayan eskişehir escort bayan erzurum escort bayan elazığ escort diyarbakır escort escort bayan Çanakkale Bursa Escort bayan Balıkesir escort aydın Escort Antalya Escort ankara bayan escort Adana Escort bayan

Sunday, May 19, 2024
Homeठळक घडामोडीबियर बार मद्य विक्रत्यांकडून दारुचा काळाबाजार ; वाईन शॉपला लावलेल्या लॉकडाऊनचा परिणाम.....

बियर बार मद्य विक्रत्यांकडून दारुचा काळाबाजार ; वाईन शॉपला लावलेल्या लॉकडाऊनचा परिणाम.. ; लॉकडाऊन च्या तोंडावर मद्याची चढ्या दराने विक्री..

पाटण:- गेल्या आठवड्यापासून राज्य सरकारने सुरु केलेल्या मिनी लॉकडाऊन मधे अत्यावश्यक सेवेवितीरीक्त हौटेल, बीयरबार मद्य दुकाने मधून दारुची पार्सल सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय दिला. याचा पुरेपूर फायदा पाटण शहरासह तालुक्यातील बीयरबार मद्यदुकान मालकांनी घेतला असून यांनी एम.आर.पी. दरापेक्षा दारुची भरमसाठ चढ्या दराने विक्री सुरु केली आहे. शासनाच्या मान्यता प्राप्त वाईन शॉप मधून मद्याची पार्सल सेवा एम.आर.पी.दरानेच सुरु होती. मात्र सरकारनेच वाईन शॉपला बंदी घालून बीयरबार मद्यदुकानातून दारूचा काळा बाजार सुरु केला असल्याची तीव्र भावना मद्यपी व्यक्त करत आहेत.. याला आवरतरी घालणार कोण असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.. आता तर पूर्ण लॉकडाऊन सुरु होत आहे.. यात तर बीयरबार वाल्यांची चांदीच होणार असल्याचे बोलले जात आहे.

मिनी लॉकडाऊन काळात सरकारने अत्यावश्यक सेवेबरोबर सरकारला करप्रणाली वाढवून देणाऱ्या मद्याची दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय दिला. मात्र यामधून पार्सल सेवा व एम.आर.पी. दराने मद्य मिळणारे वाईन शॉप वगळल्याने इतर बीयरबार मद्य दुकानदारांनी एम.आर.पी.पेक्षा भरमसाठ चढ्या दराने मद्य विक्री सुरू करुन मद्याचा काळाबाजार सुरु केला आहे. सरकार मद्यविक्रीत एम.आर.पी. दरात करप्रणाली घेत असताना बीयरबार मद्यविक्री दुकानदारांनी जादा दुकान मालकी दर लावून एकप्रकारे मद्यपींची आर्थिक लूट सुरु केली आहे. यावर संबंधित यंत्रणेचे सोयीस्कर दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे. मद्यपी बीयरबार दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे मद्यपींच्या भावना संतप्त झाल्या आहेत.

* वाईन शॉप बंद ठेवून ग्राहकांच्यावर अन्याय.
पाटण येथील वाईन शॉप मालकांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले वाईन शॉप मधून मद्य विक्री एम. आर. पी. दरालाच केली जाते. त्यापेक्षा जादा दराने अम्हाला मद्यविक्री करता येत नाही. वाईन शॉप मधून सोशल डिस्टीक्शन पाळून पार्सल सेवाच कायमस्वरूपी सुरु होती. ती बंद करुन बीयरबार मद्यविक्री दुकानदारांना मद्यविक्रीची पार्सल सेवा सुरु ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. बीयरबार मालकांना मद्यविक्रीच्या एम.आर.पी. पेक्षा केवळ पाच टक्के जादा सर्व्हिस चार्ज लावणे बंधनकारक असताना या दुकानदारांनी मद्यविक्रीवर भरमसाठ दर लावून ग्राहकांच्यावर मनमानी सुरु केली आहे. तर वाईन शॉप बंद ठेवून सरकारने ग्राहकांच्यावर अन्याय केला आहे.

* जादा दराने दारु विकणारे बीयरबार दुकाने बंद करा.
यावर सामान्य ग्राहकाची प्रतिक्रिया घेतली असता तो म्हणाला सरकारचा अर्थिक कणा असलेल्या दारु विक्री व्यवसायातून मोठी करप्रणाली सरकारच्या तिजोरीत जमा होते. बीयरबार मद्यविक्री दुकानदारांकडून दारुविक्रीवर काळ्या बाजाराने लावलेल्या भरमसाठ दरामुळे सरकारला कमी मात्र दुकानदारांना जादा करप्रणाली प्राप्त होत आहे. यात सामान्य ग्राहक मात्र कंगाल होत आहे. अशा बेकायदेशीर जादा दराने दारू विक्री करणाऱ्या बीयरबार मद्य विक्री दुकानदारांवर शासनाने कारवाई करून त्यांची दुकाने सील केली पाहिजेत..

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular