सातारा : जॉयटस् ग्रुप ऑफ सातारा व एन.डी. जोशी स्मरणार्थ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय चतुरंग 2016 या जलद गती बुध्दीबळ स्पर्धेत खुल्या गटात पुण्याचा चिन्मय कुलकर्णी विजेता ठरला.
या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, ठाणे, नंदुरबार, रायगड या जिल्ह्यातून 175 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्याला बक्षीस वितरण चितळे उद्योग समुहाचे संचालक गिरीष चितळे यांच्या हस्ते व जॉयटस् ग्रुप ऑफ सातारचे अध्यक्ष अॅड. नितीन शिंगटे, उपाध्यक्ष श्रीनिवास अत्रे, अमोल सणस, सचिव यशवंत गायकवाड, सातारा जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष जयंत उथळे, यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी एन.डी. जोशी ट्रस्टचे विश्वस्त मंकरंद जोशी उपस्थित होते.
या स्पर्धेत 7 वर्ष खालील गटात आरिष इनामदार प्रथम, जिया शेख द्वितीय, मयंका जोशी तृतीय, 9 वर्ष खालील गटात यश भागवत प्रथम, दक्षीयाण चव्हाण द्वितीय, आश्विनी साबणे तृतीय, 11 वर्षाखालील गटात इनास शेख प्रथम, वरद आठले द्वितीय, स्वरा टकले तृतीय, 13 वर्षाखालील गटात शौनक भट प्रथम, अभिजीत भोसले द्वितीय, ओम सुर्वे तृतीय, 15 वर्ष खालील गटात श्रेयांसु माने प्रथम, निहीर जोशी, श्रावणी बोरकर, 19 वर्षाखालील गटात शुभम मालाणी, शार्दुल तपासे, सिध्दीक संगटी, हे खेळाडू विजेते ठरले. गुरूकुल स्कुलला मोस्ट पार्टीशिपी स्कुल व निर्मल स्कुलला बेस्ट स्कुलचे पारितोषिक मिळाले. बेस्ट व्हेटनरचे शिरीष गोगटे, मोस्ट ज्युनिअर बॉय विहंग जोशी, मोस्ट ज्यु, गर्लचे श्रेया यादव, बेस्ट डिसेबल अमित देशपांडे यांना पारितोषिक मिळाले.
खुल्या गटात चिन्मय कुलकर्णी प्रथम, सुयोग वाघ द्वितीय, तर निहाल अहमद मुल्ला याला तृतीय पारितोषिक मिळाले. विजेत्यांना रोख बक्षीसे व स्मृती चिन्ह व पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.