13 पैकी 11 जागा जिंकत मिळवले निर्विवाद वर्चस्व
वडूज : शहर परिसराबरोबर संपुर्ण खटाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनेलने 13 पैकी 11 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विरोधी सहकार परिवर्तन पॅनेलला केवळ दोन जागेवर समाधान मानावे लागले.
शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे, विद्यमान अध्यक्ष एम. एस. उर्फ बबनराव गोडसे (469), शिवाजी भाऊ गोडसे (470), गोविंद किसन काळे (402), मानसिंग नारायण गोडसे (426), वामन पांडुरंग गोडसे (399), शरद आनंदराव पाटील (404) सर्व सर्वसाधारण प्रवर्ग, हरिश्चंद्र काळे (466) भटक्या विमुक्त प्रवर्ग, विजय बजरंग खुडे (454) अनुसुचित जाती प्रवर्ग, महिला राखीव गट लिलावती गोडसे (438), शारदा राजगे (419) तर याच पॅनेलचे धनंजय मारुती राऊत ओ.बी.सी. प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी परिवर्तन पॅनेलला हिंदुराव नारायण गोडसे (399) व प्रमोद संभाजी गोडसे (404) या दोन जागेवर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. बंडा गोडसे, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, जेष्ठ नेते विश्वासराव काळे, माजी सरपंच अर्जुनराव गोडसे, भरत घनवट, विजय काळे, दिपक गोडसे, संजय काळे, महेश गोडसे, मुरलीधर गोडसे, टी. जे. गोडसे, विजय गोडसे आदिंसह मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. सहाय्यक निबंधक प्रिती काळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत मतदान झाले. मतमोजनी दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत चालली होती. ही निवडणूक अतिशय चुरशीने झाल्याने शेवटच्या क्षणापर्यंत मतमोजनीची घासाघीस चालू होती. निकाल जाहीर होताच शेतकरी पॅनेलच्या विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण करत सिध्दीविनायक मंदीर ते जोतिर्लींग मंदीर अशी छोटेखानी मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा केला