सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास कंन्टेनर दुभाजकास धडकून पलटी होवून टेम्पोवर आदळल्याने टेम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात टेम्पोंचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली सविस्तर माहिती अशी की, सातारा बाजूकडून कराड बाजूकडे भरधाव वेगात चाललेला कंन्टेनर (क्रं. टी. ब. 04 एस. 9595) हा खिंडवाडीजवळ चिंध्यापीर समोर 5.30 वाजता लंभ दुभाजकास धडकून पलटी पलटी होवून दुसर्या लेनकडे गेल्याने कराड बाजूकडून येणार्या टेम्पो (क्रं. एम. एच. 12 एम. व्ही. 6537) याला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघतात टेंम्पो चालक गंभीर जखमी झाला आहे. मात्र त्याचे नाव, गाव समजलेले नाही. या अपघातात टेंम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या अपघातामुळे सातारा व कराड या दोन्ही बाजूकडे सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळी उशीरापर्यंत ठप्प झालेली वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर करण्यासाठी पीसीआर पथकातील अधिकारी, कर्मचारी तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी परिश्रम घेत होते.
( छाया- संजय कारंडे आणि पांडुरंग राऊत )