महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहिम उत्साहात
महाबळेश्वर : महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग व महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्यावतीने महाबळेश्वर व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून तसेच याचा शुभारंभ उपनगराध्यक्ष अफझलभाई सुतार, नगरसेवक कुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश वायदंडे न पा चे स्वच्छता निरीक्षक बबन जाधव, अरुण वायदंडे, मनोज चव्हाण, हशम वारुणकर, अयुब वारुणकर, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या सदस्या अनिता वरपे, योगिता आगवणे, सुवर्णा जाधव, मीनाक्षी चव्हाण, शीतल इटे, गौतम जाधव, जयश्री वागमारे, रेणुका कांबळे, विमल वायदंडे, दैवशीला गायकवाड, मंगल वायदंडे, सिमा सकटे तसेच वसंत वायदंडे, शुभम खरे, अनिकेत मोरे सागर कांबळे बाबू कांबळे गणेश मोरे वैभव खंडझोडे हर्षद वायदंडे नारायण भट आदी उपस्थित होते. या स्वच्छता मोहिमेत शेकडो झोपडपट्टी रहिवाशी सहभागी झाले होते यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल व महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या सहकार्याने महाबळेश्वर मधील द क्लब पासून वेण्णालेक या तीन किमीच्या मुख्य रस्त्याची स्वच्छता करण्यात आली यासोबतच महाबळेश्वरच्या नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली वेण्णालेक वर असलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टोल्स व त्यामागील बाजूस असलेल्या संपूर्ण परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला.
या मोहिमेत महाबळेश्वरातील शेकडो झोपडपट्टी रहिवाश्यांच्या सहभाग होता. यामध्ये महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता या स्वच्छता मोहिमेत दोन ते तीन टन कचरा गोळा करण्यात आला. नगरपालिकेच्या वतीने स्वच्छतेसाठी आवश्यक असणारे सर्वच साहित्य देण्यात आले होते.
यावेळी न. पा. चे स्वच्छता निरीक्षक बबन जाधव, अरुण वायदंडे,मनोज चव्हाण,हशम वारुणकर, अयुब वारुणकर ही स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या सदस्या अनिता वरपे, योगिता आगवणे, सुवर्णा जाधव, मीनाक्षी चव्हाण, शीतल इटे, गौतम जाधव, जयश्री वागमारे, रेणुका कांबळे, विमल वायदंडे, दैवशीला गायकवाड, मंगल वायदंडे,सिमा सकटे तसेच वसंत वायदंडे, शुभम खरे, अनिकेत मोरे सागर कांबळे बाबू कांबळे गणेश मोरे वैभव खंडझोडे हर्षद वायदंडे, नारायण भट आदी उपस्थित होते.
दरम्यान, झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या या स्वच्छता मोहिमेत श्री व सौ बोराटे (पुणे) या अंध दाम्पत्याचा देखील सहभाग होता त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत स्वच्छता करीत या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला.