सातारा: सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने दि. 31 ऑक्टोबर 2017 या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करणेत येतो. या निमित्ताने पोलीस विभागाच्या वतीने सातारा शहरातील मुख्य रस्त्यांवरुन पोलीस संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
31 ऑक्टोबर 2017 रोजी पोलीस मुख्यालय सातारा येथे राष्ट्रध्वजास सलामी व 4.30 वाजता रुटमार्च करण्यात येणार आहे. हा रुटमार्च पोलीस मुख्यालय सातारा – पोवई नाका – नगरपालिका- कमानी हौद-मोती चौक-शेटे चौक- मुख्यालय या मार्गे राहणार आहे.
या रुटमार्चमध्ये राष्ट्रीयध्वज पार्टी,पोलीस प्लॉटुन्स- 1, 2, 3,4. बॅन्ड पथक, एन. सी.सी. प्लॉटुन्स, होमगार्ड प्लॉटुन्स, डॉग युनिट, वज्र वाहन, जलद कृती दल ( टठढ) निर्भया पथक यांचा समावेश राहील. पथकाने रुटमार्च केल्यानंतर पुन्हा पोलीस मुख्यालय, सातारा येथे येतील व राष्ट्रध्वजास सलामी देतील व रिट्रीट झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल, असेही पोलीस अधीक्षक श्री. पाटील यांनी कळविले आहे.