14 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह 

सातारा दि. 21 ( जि. मा. का ) :  एन. सी. सी. एस. पुणे येथे  तपासणी करण्यात आलेल्या 14 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्येफलटण तालुक्यातील शेरेचीवाडी ( हिंगणगाव )  येथील  61 व  32 वर्षीय पुरुष आणि 27 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील वडगाव (उंब्रज) येथील 28, 20 व 44 वर्षीय महिला.
खटाव तालुक्यातील वाकळवाडी येथील  35 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष.
माण तालुक्यातील खोकडे येथील 34 वर्षीय पुरुष.
जावली तालुक्यातील  म्हातेखुर्द येथील 54 वर्षीय महिला व 62 वर्षीय पुरुष, केडांबे येथील 65 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील राजापूरी येथील 5 वर्षीय बालिका व 31 वर्षीय महिला.