वडूज:- (वार्ताहर) खातगुण ता. खटाव येथील ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीतील दगड घोटाळा प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावे यासाठी तहसील कार्यलयाशेजारी मनसे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे तालुका अध्यक्ष रामदास वाघचौडे यांच्यासह कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत.
खातगुण ता. खटाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेतून दोन विहिरींच्या खोलीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यातून निघालेला दगड सरपंचांनी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या संगनमताने विकला आहे. शासनाची रॉयल्टी तसेच ग्रामपंचायतीचा महसूल बुडवून फसवणूक करणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना तातडीने निलंबित करावे यासाठी वडूज तहसील कार्यलयाशेजारी मनसेच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे.
या उपोषणास सागर पवार, बाळासाहेब गायकवाड, दीपक लावंड, विवेक जाधव, आरती देशपांडे, राजेंद्र देशपांडे, अशोक वाघाचौंडे, अविनाश जाधव, अमोल जाधव, अनिल सातारकर, मीनाक्षी गुजर, गजानन लावंड, सुधीर गायकवाड, सागर शेगर, साजिद मुल्ला, संदीप बुधावले आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.