कोव्हॕक्सिन व कोव्हीशिल्ड लसींचा दुसरा डोस त्वरीत उपलब्ध करुन वृध्द नागरिकांचे हाल थांबवा -: राजेश भोसले

सातारा :- सरकारने लस घेणे आरोग्यासाठी बंधनकारक करुन पहिला डोस कसाबसा दिला. पण दुसरा डोस २३ तारखेपासून कोव्हॕक्सिनचा व २८ तारखेपासून कोव्हीशिल्डचा मिळणे पूर्णपणे बंद झाले आहे. दुसरा डोसची तारिख संपूनही डोस न मिळाल्यामुळे प्रामुख्याने वयोवृध्द – जेष्ठनागरिक यांची ससेहोलपट होत असून त्यांचे हाल होत आहेत, एकतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची भिती व त्यात दुसरा डोस न मिळाल्याची खंत यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण व दडपण येत आहे.-याचा दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर होऊ नये म्हणून राज्य सरकार ,जिल्हा प्रशासन ,आमदार ,खासदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी याबाबत तातडिने लस उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती व जाहिर आवाहन जेष्ठ समाजसेवक राजेश भोसले यांनी आज परिपञकाव्दारे केले आहे.