महाबळेश्‍वर येथील सर्व पॉईंट बंद करण्याबाबत वन विभागास पालिकेची नोटीस; विनापरवानगी पॉईंटवर प्रवेश केला तर गुन्हा दाखल होणार

महाबळेश्‍वर : प्रसिध्द उद्योगपती अनिल अंबानी हे कोविडचे नियम पायदळी तुडवुन रोज गोल्फ मैदानावर वॉक घेतात म्हणून पालिकेने कारवाईचा बडगा उगारून ते मैदान बंद करणे भाग पाडले. आता पालिकेची वक्रदृष्टी येथील वन विभागाच्या विविध पाँईटवर पडली आहे. विविध पाँइर्ंटवर नागरिक वॉकसाठी जातात म्हणून हे सर्व पॉइर्ंट बंद करण्याबाबत पालिकेने वन विभागास कळविले आहे. अन्यथा वन विभागावर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने नोटीस बजावुन दिला आहे.
लॉकडाउनमध्ये संचार बंदीचे आदेश आहेत असे असताना काही नागरीक सकाळी व सायंकाळी वॉकसाठी विविध पॉइर्ंटवर जात आहेत. यामध्ये विल्सन पॉइर्ंट, मुंबई पॉइर्ंट, लॉडविक पॉइर्ंट, पोलो मैदान आदी पाँईटचा समावेश आहे हे सर्व पॉइर्ंटची मालकी वन विभागाकडे आहे. नागरिक नियम मोडुन वॉक घेत आहेत तरी वन विभाग बघ्याची भुमिका घेत आहे म्हणून पालिकेने वन विभागावर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी थेट वन विभागास नोटीस बजावली आहे. पालिकेने नोटीस ब अ जावताच वन विभागाने सर्व पाँईट नागरीकांसाठी बंद केले आहेत. सर्व पाँईटवर प्रवेशव्दारावर गेट लावुन बंद करण्यात आले आहे. पॉइंर्ंट बंद असताना जर कोणी विनापरवानगी पाँईटवर प्रवेश केला तर अशा नागरीकांवर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा वन विभागाने दिला आहे.
कोविडचा संसर्ग वाढु नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे त्या अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरीकांनी घरातुन बाहेर पडु नये नियमांचे पालन करून कोविड विरोधातील लढाईत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे.