Sunday, June 22, 2025
Homeअर्थविश्वक्रिडाईच्या वास्तू 2016 प्रदर्शनात प्रॉपर्टीचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध ; अश्‍विन...

क्रिडाईच्या वास्तू 2016 प्रदर्शनात प्रॉपर्टीचे सर्व पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध ; अश्‍विन मुद्गल

सातारा ः क्रिडाई सातारा सेंटरने प्रथमच आयोजित केलेले वास्तू 2016 हे वास्तू विषयक प्रदर्शन सातारा शहारातील सुंपर्ण प्रॉपर्टी विश्‍वाचा वेध घेणारे असून या प्रदर्शनामुळे ग्राहकांना घरापासून ते ऑफिस पर्यंत सर्वच प्रकारातील पर्याय एकाच छताखाली व एकाच ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. क्रिडाईने हे वास्तू प्रदर्शन इन हाऊस प्रकारात घेऊन सातार्‍यात पारंपारिक पध्दतीच्या प्रदर्शनांच्या आयोजनाला वेगळे स्वरूप प्राप्त करून दिले आहे असे उद्गार साताराचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी काढले.
क्रिडाई सातारा  सेंटरने दि. 20 ते 23 ऑक्टोबर 2016 दरम्यान  सातारा सिटी बिझनेस सेंटर, राधिका रोड सातारा येथे आयोजीत केलेल्या वास्तू 2016 या वास्तू विषयक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, क्रिडाई सातारा सेंटरचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, सचिव सुधीर शिंदे, एचडीएफसी चे बिझनेस डेव्हलपमेंट हेड श्री. शरद कुमार, पॅनेशिया कंपनीचे आकाश शिंदे व नितीन परदेशी, वास्तु 2016 चे चेअरमन दिपक पाटील, अमेय आगटे, समन्वयक जयंत ठक्कर, मजीद कच्छी, सचिव सुधीर घार्गे, विवेक निकम, क्रिडाईचे खजिनदार सुधीर ठोके, सागर साळुंखे, अभिजीत पाटील, संदिप चव्हाण, राहुल वखारिया, मंगेश वाडेकर, जितेंद्र भोसले, शकील सय्यद, बिल्डर्स असोसिएशन साताराचे अध्यक्ष मंगेश जाधव, सचिव चंद्रसेन जाधव,  माजी अध्यक्ष सचिन देशमुख, आर्किटेक्ट असोसिएशनचे मयुर गांधी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील म्हणाले की, क्रिडाई ही बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्था असून बांधकाम व्यावसायिकांना या संस्थेमार्फत दिलेल्या नियम व अटीत काम करावे लागते, क्रिडाई साताराने वास्तू 2016 या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. पहिल्या प्रयत्नाच क्रिडाईने पुण्या मुंबईच्या तोडीस तोड प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनामुळे सातारा बाहेरीलही  मोठी गुतंवणूक सातार्‍यात होऊन सातारच्या बांधकाम क्षेत्रास मोठी चालना मिळेल.यावेळी बोलताना क्रिडाई सातारा सेंटरचे अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर महणाले की, या वास्तू प्रदर्शनात रूपये साडे सात लाखापासून ते रूपये एक कोटी पर्यंतचे गुंतवणूकीचे अनेक पर्याय एकाच ठिकाणी ग्राहकांना पहायला मिळतील. सातार्‍यातील सर्व नामवंत बिल्डर्स वास्तू-2016 मध्ये सहभागी झाले असून सुमारे 50 स्टॉल्स् हे या प्रदर्शनाचे वैशिष्ठय आहे. बिल्डर्स बरोबरच बिल्डींग मटेरियलचे देखील स्टॉल्स् वास्तू-2016 मध्ये सहभागी आहेत. तसेच ग्राहकांना अनेक पर्यायाबरोबरच खूप सार्‍या सवलतीदेखील प्रदर्शनातील बुकींगबरोबर मिळणार आहेत. वास्तू 2016 या प्रदर्शनाचे प्रायोजकत्व एचडीएफसी यांनी तर सहप्रायोजकत्व पॅनेशिया या लिफ्ट उत्पादक कंपनीने स्वीकारले आहे.तर इव्हेंट पार्टनर म्हणून सहकार्य केलेल्या ठक्कर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, ब्रम्हा डेव्हलपर्स, कच्छी प्रॉपर्टीज, मातोश्री लँडमार्क, सिध्दीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एस.जी.सी. यांचेही विशेष सहकार्य आम्हांला मिळाले आहे. यावेळी श्रीधर कंग्राळकर व सुधीर शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल व जिल्हा पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी संपुर्ण प्रदर्शनाची पहाणी करून विविध स्टॉल्सची माहिती घेतली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular