सातारा : सज्जनगड रोड डबेवाडी येथील ऐश्वर्या नगरीच्या यशस्वी प्रकल्पानंतर सौ. कविता व राजेंद्र चोरगे यांचा अजून एक नवा महत्त्वकांक्षी प्रकल्प ऐश्वर्या एम्पायर नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून शाहूनगर गोडोली येथे भव्य एन. ए. प्लॉटस, दिड गुंठ्यापासून पुढे असणारे प्लॉटसची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे असून, वातावरणात प्रदुषण मुक्त ठेवणारी लँडस्केप गार्डन आणि मुलांना खेळण्यासाठी खास उद्यान, प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी सिक्युरिटी केबीन, नउ मीटर रुंदीचे अंतर्गत डांबरी रस्ते, पथदिवे, संपूर्ण प्रकल्पाला सुरक्षिततेच्या दृष्टीने भक्कम संरक्षक भिंत, याखेरीज पाण्याची सोय, बंदिस्त गटर्स, आरोग्यपूर्ण वातावरण अजिंक्यतार्याच्या कुशीत आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात.
दोन्ही बाजूंनी महानगरं, कॉक्रिटची जंगल विस्तारत असताना सातारा स्थितप्रज्ञ राहून विकासाची खरी व्याख्या शोधत राहिला. नैसर्गिक वारसा जपत राहिला. जगातल्या दहा पर्यावरणीय हॉटस्पॉट पैकी एक असणार्या पश्चिम घाटातील दोन जागतिक वारसास्थळं सातार्याला लाभली आहेत. आज हाच निसर्ग सातार्याचं बलस्थान ठरलाय. म्हणूनच, समृध्द जीवनशैली कशाला म्हणतात, सातार्यातून नोकरीनिमित्त बाहेर गेलेला माणून निवृत्तीनंतर राहण्यासाठी सातार्यात घर बांधतो आणि बाहेरुन सातार्यात नोकरी व्यवसायानिमित्त आलेला माणून इथंच घर बांधून स्थायिक होतो, हा आजवरचा इतिहास आहे. निसर्गाच्या कुशीत इतकं निवांत जगणं महाराष्ट्रातल्या दुसर्या कुठल्याही शहरात शक्य नाही.
पेन्शनरांचं शहर म्हणून कुणी कितीही हिणवलं तरी सातार्यान कुससुध्दा बदलली नाही, याचं कारण हीच जीवनशैली माणसाला मनापासून हवी असते. पैशांबरोबरच माणसाला मानसिक स्थैर्य हवं असतं. मन:स्वास्थ्य हवं असतं.उगाच उर पुटेपर्यंत धावाधाव नाही आणि अगदीच कासवाची गतीही नाही, असा सातार्याचा अचूक जीवनवेग पाहून कुणीही म्हणतं की राहावं तर सातार्यात घर बांधावं तर सातार्यात. तुमचं नवं घर पोवईनाक्यापासून अवघ्या पाच मिनीटावर. राष्ट्रीय महामार्गापासून तर फक्त चार किलोमिटरवर… शहराच्या हाकेच्या अंतरावर असूनही जणू निसर्गात राहिल्याचं सुख खरं नाही ना वाटत? मग प्रत्यक्ष बघून खात्री कराच.
ऐश्वर्या एम्पायरला उत्स्फूर्त प्रतिसाद ; सौ. कविता व राजेंद्र चोरगे यांचा महत्वकांक्षी प्रकल्प
RELATED ARTICLES