Sunday, June 1, 2025
Homeठळक घडामोडीतोतया पत्रकार - पोलिसांची मल्हारपेठेत झाडा- झडती ; नागरिकांच्या सतर्कतेने पाच...

तोतया पत्रकार – पोलिसांची मल्हारपेठेत झाडा- झडती ; नागरिकांच्या सतर्कतेने पाच जण पोलिसांच्या ताब्यात.

पाटण : मल्हारपेठ येथे पोलिस अधिकारी असल्याचे सांगुन मल्हारपेठ येथे बुधवारी तोतया पोलिस व पत्रकारानी जय मल्हारनगर मधील अवैध व्यवसायिकांच्या घराची झाडाझडती घेतली त्यांच्या कारवाईबाबत संशय आल्याने त्या पाच जणांविरुद्ध मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा नोद करण्यात आला आहे.
मल्हारपेठ पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार मल्हारपेठ येथे पोलिस टाईम्सचे पत्रकार व पोलिस अधिकारी असल्याचे सांगत बुधवार दि. 6 रोजी 3 वाजण्याच्या सुमारास जिप्सी गाडी क्र. चक. 15 ET 5573 या गाडीतून आलेल्या पाच तोतया पत्रकारांनी अवैध व्यावसायिकांच्या भेटी घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. तसेच एकाच्या घरात घुसून अवैध मुद्देमालाची तपासणी केल्या प्रकरणी फिर्यादी शाहूल तानाजी भिसे (वय 32) यांनी या आरोपी शिवाजी पवार, ओकार गायकवाड, अमर गायकवाड, तुषार सणस, सर्व रा. आसणगाव, ता. जि. सातारा व रणजित कसबेकर रा संगमनगर या पाच जणांविरुद्ध मल्हारपेठ पोलिस दुरक्षेत्रात गुन्हा नोद केला आहे. फिर्यादी यांचा कोणताही दारुचा व्यवसाय नसताना यातील आरोपी यांनी ते पोलिस अधिकारी आहेत असे सांगून तु दारूचा धंदा करतोस असे सांगून जबरदस्तीने घरात घुसून सपूर्ण घर चेक केले काही मिळुन आले नाही म्हणून फिर्यादी यास मेनरोड पर्यत त्यांनी लावलेल्या गाडीपर्यंत आणले तर गाडी मध्ये मल्हारपेठ येथील अनिल माने यांना जुगाराचा धंदा करतात म्हणुन धमकी देऊन गाडीत बसवून त्यांच्याकडुन 3500 रुपये घेतले अचानक असा प्रकार घडल्याने ग्रामस्थात चर्चा चालु झाल्यानंतर पोलिसाना याबाबत सांगण्यात आले त्याने संबधीत पाच जणाना पोलिस स्टेशन मध्ये नेहुन चौकशी केली तर ते गुन्हे पोलिस टाईम्सचे पत्रकार आहेत असे सागण्यात आले तर त्यांच्याकडे जिप्सी गाडी 16 हजार रुपये रोकड व पावती पुस्तक मिळुन आले आहे.
 कारवाईची ही बातमी सर्वत्र पसरताच या तोतया पत्रकारांनी  नागठाणे, अतित,  काशिळ ,उब्रज व विहे येथेही अवैध धंद्यावर रेड मारून पैसे उकळण्याचा असाच प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत रात्री 1 वाजता गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पार पडली  या पाच ही अरोपीना अटक केली असून पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, मल्हारपेठचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जावीर अधिक तपास करत आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular