सातारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक तब्बसुम मुल्ला याला 15 हजार 800 रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे.
गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्हा औद्योगिक वसाहत कार्यालयातील क्लर्कला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून सलग दुसर्या कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.