सातारा : सातारा व सांगली जिल्ह्यातील मंदिरामध्ये चोर्या करणार्या पाच जणांच्या आंतर जिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी रात्री महामार्गावर खिंडवाडी गावाच्या परिसरात आवळल्या या टोळीकडून दोन मोटारसायकल पाच मोबाईल व आठशे वीस रुपये रोख असा 1 लाख 20 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईची पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना खिंडवाडी परिसरात काही संशयास्पद इसम येणार असल्याची पक्की खबर मिळाली होती घनवट यांच्या सूचनेनुसार सागर गवसणे त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री सापळा रचत खिंडवाडी गावाच्या कमानीनजीक हिरो स्टनर व यामाहा एफ झेड या दोन दुचाकीवर आलेल्या सहा जणांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता सातारा व सांगली जिल्ह्यातील दहा मंदिरामध्ये त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले यामध्ये सोमेश्वर मंदिर गुरसाळे, ता. खटाव मायाक्का देवी शिवडे, ता. खटाव, ज्योतीबा मंदिर ता. खटाव, गणपती मंदिर कोळेवाडी, ता. कराड, नटराज मंदिर मौजे कुडाळ ता. जावली, धानाई जाकावी कार्वे, ता. कराड, समर्थ व्यसनमुक्त केंद्र आंबेघर, ता. जावली बडेखान बाबा मंदिर निमसोड, ता. खटाव, हरणाई देवी भूषणगड, ता. खटाव गाजीबाबा सवारबाबा दर्गा कुर्ली, ता. खानापूर विरोबा देवस्थान कुरुंदवाडी झरे, ता. आटपाडी, जि सांगली या मंदिरांचा समावेश आहे. अक्षय उत्तम मोहिते जोंधळखिंडी, ता. खानापूर, रवि विजय चंदनशिवे खानापूर सांगली, अक्षय शामराव साठे आंबेगाव, ता. कडेगाव, संजय सदाशिव गुगले डोराळे, ता. खानापूर आदिनाथ विनोद घाडगे जोंधळ खिंडी, ता. खानापूर अशी आरोपींची नावे आहेत.