साताराः सातारा व अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना आडवून दरोडा टाकून धुमाकूळ घालणार्या टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या. याप्रकरणी संभाजी ऊर्फ गोट्या नवनाथ गायकवाड (वय 20) रा. बेनवडी, ता. कर्जत, जि. सातारा, दत्तात्रय मोहन वाकळे (वय 28), राम बबन वाघ (वय 25) रा. हातवळण, ता. जि. नगर, बसंत ऊर्फ भाऊसाहेब मारुती धाडगे (वय 26) रा. वडगाव, तांदळी, जि. नगर, मोहन बाळू जाधवय (वय 21) , अभिनव भगवान चव्हाण (वय 23) दोघेही रा. इंदोली, ता. कराड यांना अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना आडवून हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेणार्या टोळीने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या सागर गवसणे यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार अतित बस स्थानकामध्ये सापळा लावला. त्यावेळी बस स्थानकामध्ये सहा इसम पल्सर व स्पेल्डर मोटारसायकलवर संशयीरित्या फिरत असताना त्यांना घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता एक पल्सर व स्पेल्डर मोटार सायकल, 5 मोबाईल फोन, गुन्ह्यात चोरी केलेली 3 हजार 70 रुपये रोख रक्कम असे एकूण 1 लाख 19 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल आढलून आला. तसेच त्यांनी रंगपंचमीच्या आदल्या दिवशी बोरगाव पोली ठाणे हद्दी एका ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून सुमारे 50 हजार रुपयांस लुटले. तसेच कराड तालुका हद्दीत एक ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून 15 हजार रुपये लुटल्याची कबुली दिली. या कारवाईत पोनि गवसणे, शशिकांत मुसळे, प्रसन्न जर्हाड, सफौ. विलास नागे, सुरेंद्र पानसंडे, ज्योतीराम बर्गे, संजय पवार, मोहन नाचण, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, महेश शिंदे, मारुती अडागळे, अमित गोळे यांनी सहभाग घेतला.