पाटण : ठाणे येथून पुणे- सातारा मार्गे चिपळुणला लाखो रूपये खैराचे लाकुड घेऊन जाणारा ट्रक सातारा वनविभागाने चिपळुण येथे पकडला. ठाणे ते चिपळुण हा कोकण मार्ग जव0;ळ असताना पुणे मार्गे खैराची वाहतूक होताना आश्चर्य वाटत आहे.या कारवाईत ट्रक चालकाला वनविभागाने ताब्यात घेतले या ट्रक चालकाने खैराच्या वाहतुकीत ठाणे पासून ते चिपळुण पर्यंत वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचा हात आसल्याचे उघड केले आहे. यात सातारा येथील एक-दोन फॉरेस्ट कर्मचार्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे. मात्र यात ठाणे पासुन चिपळुण पर्यंत गुंतलेले अधिकारी गुलदस्त्यातच आहेत. खैराच्या वाहतुकीत मोठे रॅकेट असण्याची शक्यता असुन या कारवाईने पश्चिम महाराष्ट्र सह कोकणात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी. कात बनविण्यासाठी वापरात येणारे खैराचे लाकुड ठाणे येथून चिपळुणला कारखान्यात (भट्टीत) आणले जाते.या लाकडाची वाहतूक ठाणे ते कोकण मार्गे चिपळुण या जवळच्या मार्गे होणे अपेक्षित असताना.कोकणातील वनविभागाचे जवळ-जवळ असणारे चेक नाके त्यांचा ससेमीरा, हाफ्ते चुकविण्याच्या उदेशाने ठाणे-पुणे-सातारा मार्गे चिपळुण असा मार्ग खैराची तस्करी करणा-या गुडांनी निवडला. यात ठाणे वन विभागाचा अधिकारी या तस्करी गुडांच्या पाठीशी असल्याचा संशय असुन त्यांच्या कृपा अशिर्वादाने ठाणे व्हाया पुणे सातारा चिपळुण अशी खैराच्या लाकडाची वाहतुक सुरू झाली आहे.
सातारा वनविभागाचे मोबाईल स्कॉड आर.एफ.ओ. संदिप गवारे यांनी दिलेली माहिती अशी खैराच्या लाकडाची वाहतुक करणारा ट्रक क्र. चक 07 509 शुक्रवारी दि.10 जून रोजी ठाण्यावरू पुणे सातारा मार्गे चिपळुण च्या हद्दीत आल्यानंतर या ट्रक च्या मागावर असणार्या सातारा फॉरेस्टने ट्रक पकडून अकरा टन खैर लाकुड ( अंदाजे रक्कम – आठ लाख रूपये) मुद्दे मालासह चालक आबा आणि सायफीक संपूर्ण नावे समजू शकली नाहीत.असे दोघेजन अटक केली आहे. अधिक तपासासाठी अरोपीनां ठाणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
या खैर तस्करी बाबत अधिक सुत्रा कडून समजलेली माहिती अशी.ठाणे येथून खैर तस्करी करताना तेथील एका वरिष्ठ अधिकाराचे हात ओले केले जातात. साहेब तुम्हाला पैसे दिले तरी वाटेत चिपळुण पर्यंत तुमच्या लोकांना पैसे द्यावे लागतात. यात कोंबडी पेक्षा मसालाच जादा होतो.मग या धंद्यात मसाला परवडत नाही.अस खैर तस्करी कडून त्या अधिकार्याला सांगितले नंतर मला पैसे दिल्यानंतर दुसर्या कोणाला द्यायची गरज नाही.जर कोणी मागीतलेच तर मला सांगा आपण बघून घेऊ असे अधिकार्या कडून सांगितले जाते.या अधिकार्याच्या प्लॅन नुसारच खैर तस्करी करणार्या ट्रक वर कारवाई केली जाते.या ट्रक चालका कडूनच मधल्या वन कर्मचारी, अधिकारी यांची नावे वदवून घेतली गेली.या ट्रक चालकाने किती जनांची नावे सांगितली हे गुलदस्त्यातच आहे.मात्र सातारा येथील एका वन कर्मचार्यावर खैर प्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ठाणे येथील खैर तस्करीत वरद हस्त ठेवणारा अधिकारी मात्र या प्रकरणा पासुन नामा निराळा राहिला असून हा वरिष्ठ अधिकारी कोण? याच्यावर मुंबई पासून ते चिपळुण पर्यंत उलट-सुलट चर्चा वन खात्यातच सुरू आहेत.