कोरेगाव : सातारारोड, ता. कोरेगाव येथे जामा मशिद परिसरात मुस्लिम समाजाच्या दोन गटात मारहाण झाल्यामुळे सातारारोडमध्ये सकाळपासून तणावाचे वातावरण झाले होते. या मारहाणीमुळे येथील वातावरण गंभीर स्वरुपाचे ओळखून कोरेगाव पोलीस स्वरुपाचे ओळखून कोरेगाव पोलीस स्टेशनचे पो. नि. संतोष पांढरे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी इतर पोलीस फोर्स यंत्रणा मागवल्या असल्यामुळे वातावरण शांत करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारारोड येथील मशीद विश्वस्त मंडळ ट्रस्टच्यावरुन या अगोदर सुध्दा गुन्हा दाखल झाला होता. त्याचप्रमाणे सरफराज सय्यद हा जुना ट्रस्टी असून सरफराज हा आज सातारारोडमध्ये येणार ह्याची अगोदर माहिती असल्यामुळे मशिदीमध्ये सकाळी सर्व मुस्लिम बांधव बसले होते. त्याच्या माहितीप्रमाणे सरफराज तेथे आला व त्यानंतर इसरार शेख बरोबर अंतर्गत कारणावरुन वादावादी होवून भांडणाला सुरुवात झाली. तेथे दोन गटात मारहाण सुरु झाली. या मारहाणीत स्वत: इसरार शेख, समीर शेख, ताजद्दीन मुलाणी जखमी झाले. परंतु पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेप करण्यामुळे भांडणे वेळीच सोडवण्यात आली परंतु नंतर मुस्लीम समाज बांधव वाढत गेल्याने वातावरण गंभीर झाले परंतु पो. नि. संतोष पांढरे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी सातारहून अतिरिक्त पोलीस मागवून तेथील वातावरण शांत केले. शेवटी पोलीस उपअधीक्षक विजय पवार आल्यानंतर दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगून मारहाण करणार्या लोकांना पोलीस गाडीत टाकून कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सर्फराज सय्यद, इम्रान शफी सय्यद, नासीर कासम सय्यद, इरफान युसुफ सय्यद, वासीम कासम सय्यद, शोयब सलीम सय्यद, शफी कमरुला सय्यद, शकील युसुफ सय्यद, एताज कासम सय्यद, लियाकत कासम सय्यद, शहीद रफिक सय्यद, इब्राहिम अजिज सय्यद, मोहसीन पूर्ण नाव माहित नाही. सर्व रा. सातारारोड यांच्याविरोधात इसरार अहमद दारुण शेख (वय 53) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक बी. ए. सांगळे करीत आहेत.