सातारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली आयोजित विभागीय शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सातारा शाहूनगर येथील गुरुकुल स्कूलच्या आर्या देशपांडे, आयरीका अरोरा, श्रेया मुरुडकर या विद्यार्थीनीनी 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात विजय संपादन केला.
गुरुकुल अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लीना जाधव, प्राथमिक विभागाच्या शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, पर्यवेक्षक मोहन बेदरकर सहपर्यवेक्षिका सोनाली तांबोळी, क्रीडा शिक्षक प्रदिप निकम उपस्थित होते.
सदर संघाची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली असून राज्यस्तरीय स्पर्धा 22 ते 25 ऑक्टोबर रोजी बारामती येथे होणार आहेत. यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सदर विद्यार्थीनींनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपाध्यक्ष धनंजय थोरात, सचिव आनंद गुरव, मधुकर जाधव, अॅड. राजेंद्र बहुलेकर, किशोर गोडबोले, विजय पवार, नितीन माने व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES