फलटण येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई

फलटण – सरडे ता. फलटण येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या दोन जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन २० हजार ५०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व एक दुचाकीवरून जप्त केली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार सरडे ता. फलटण गावचे हद्दीत सरडे ते राजाळे रस्त्यावर खुदाबक्ष नावाचे परिसरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या मारुती बाबा जाधव (वय ४२), सुमीत सखाराम कांबळे (वय २१ दोघे रा. घाडगेवाडी ता. बारामती) यांच्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करुन २० हजार ५०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व एक दुचाकी जप्त केली आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे.