फलटण येथील हॉटेल अजिंक्य, हॉटेल मल्हार व कृषी उत्पन्न बाजार समिती अन्नपूर्णा शेतकरी कँटीन या तीन ठिकाणी मोफत शिवभोजन थाळी मंजूर

फलटण  – गोरगरीब जनतेसाठी महाराष्ट्र शासन यांच्यावतीने शिवभोजन थाळी मोफत सुरु करण्यात आली असून फलटण येथील हॉटेल अजिंक्य, हॉटेल मल्हार व कृषी उत्पन्न बाजार समिती अन्नपूर्णा शेतकरी कँटीन या तीन ठिकाणी प्रत्येकी 75 थाळी याप्रमाणे 225 शिवभोजन थाळी मंजूर करण्यात आल्या असून आज शुक्रवार दि. 16 एप्रिलपासून वाटप सुरु झाले असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली आहे.दरम्यान या थाळी दुप्पट करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्र राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असल्याने व संचारबंदी असल्याने गोरगरीब जनता व हातावर पोट असणाऱे यांची ऊपासमार होवू नये या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील विविध शहरात व फलटण येथे आजपासून मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध झाली आहे.
हॉटेल अजिंक्य महात्मा फुले चौक फलटण, हॉटेल मल्हार एस. टी. बस स्टण्डसमोर फलटण व कृषी उत्पन्न बाजार समिती अन्नपूर्णा शेतकरी कँटीन फलटण या तीन ठिकाणी प्रत्येकी 75 थाळी याप्रमाणे 225 शिवभोजन थाळी मंजूर केल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिवभोजन थाळी मोफत उपलब्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाने गोरगरीब जनतेला संचारबंदी काळात शिवमोजन थाळी मोफत उपलब्ध करुन दिली असून हातावर पोट असणारे व गोरगरीब जनतेने शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घ्यावा असे आवाहन हाँटेल अजिंक्य महात्मा फुले चौक फलटणचे हर्षद थोरात यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन असताना खरेच ज्यांना गरज आहे अशा हातावर पोट असणारे जनतेला महाराष्ट्र शासनाने मोफत शिवभोजन थाळी आजपासून उपलब्ध करुन दिली असून फलटण परिसरातील गरजूंनी याचा लाभ घेणेसाठी हॉटेल मल्हार एस. टी. बस स्टँड फलटण येथे येवून लाभ घ्यावा असे आवाहन राज राजे यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती अन्नपूर्णा शेतकरी कँटीन फलटण येथे महाराष्ट्र शासनाचे माध्यमातून मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली आहे. आजपासून 75 थाळींचे गरजूंना मोफत वाटप केले जाणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महेश राजमाने यांनी केले आहे.
शासनाचे नियमानुसार 75 थाळी उपलबध केल्या असल्या तरी जर आवश्यकता पडल्यास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव शंकरराव सोनवलकर यांनी गरजू व हातावर पोट असणारे यांचेसाठी श्रीमंत मालोजी शिदोरीचे माध्यमातून जादा लागणार्‍या भोजन थाळी नियमांचे पालन करुन शासन आदेश असेपर्यंत दिल्या जाणार असल्याचे अन्नपूर्णा शेतकरी कँटीनचे महेश राजमाने यांनी सांगितले.
शासनाचे वतीने आज सुरु केलेल्या फलटण शहरातील मोफत शिवभोजन थाळीचा अनेक गरजूंनी लाभ घेवून समाधान व्यक्त केले आहे. तर हमाल गरजू व अपंग यांनाही बाहेर येवून शासन नियमांचे पालन करुन मोफत शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले.