सातारा : सध्या माता भगिनींच्यावर होणार्या अत्याचारामूळे सर्वांचे मन सुन्न झालेले आहे. काल तडवळे ता.कोरेगांव येथील 6 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर नराधमाने अन्याय केला यामूळे कोरेगांव तालुक्यातील संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक होवून आरोपींना चोप दिला. तर सातारा येथील नाना पाटील शासकीय रूग्णालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी पिडीत बालिकेच्या पालकांना अर्थसहाय्य करून माणुसकीचे दर्शन घडविले. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या वृत्तवाहिनीवर मुलाखत देतानाच शिवसैनिकांनी अर्थसहाय्य करत असल्याचे दृश्य पाहून अनेकजनांना गहिवरून आले.
सातारा जिल्हयातील माताभगिनींवर होणा-या अत्याचाराविरोधात सामाजिक संघटना व महिला यांनी निषेध फेरी काढली होती. त्याला 24 तास होत नाहीत तेाच तडवळे ता.कोरेगांव, सकाळी एका 6 वर्षाच्या बालिकेवर गावातीलच नराधमाने अत्याचार केला ही घटना घडल्यानंतर कोरेगांव तालुक्यातील शिवसैनिकांनी आरोपीला चांगला चोप दिला त्यानंतर पिडीत बालिकेला उपचारासाठी सातार्यात दाखल केले होते.
या पिडीतीची विचारपुस करण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आले होते. त्यांना पिडीताच्या नातेवाईकांची परिस्थिती लक्षात आली. तसेच त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांचेशी चर्चा केल्यानंतर पिडीताच्या नातेवाईकांना क्षणाचाही विलंब न लावता रोख पाच हजार रूपये त्यांना दिले. तसेच झालेल्या दुदैवी घटनेबाबत शोक व्यक्त करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. असा दिलासा दिला. यावेळी पेालिस निरीक्षक बी.आर.पाटील, अजित जगताप, गिरीष चव्हाण, रविंद्र परामणे, सचिन जवळ, सचिन करंजेकर, संजय सपकाळ, व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर त्याबाबत चर्चा व स्टंटबाजी करण्यापेक्षा पिडीताला खर्या अर्थाने दिलासा देवून सातार्यातील शिवसैनिकांनी माणसुकीचे दर्शन घडविले आहे. एखादया घटनेबाबत समाजमन संतप्तच असतो त्यावेळी मोर्चा, रास्तारोको, तोडफोड करण्यापेक्षा पिडीताला न्याय व मदत मिळाली पाहिजे हा संदेश सातारकरांनी दिला आहे. पिडीत कुटूंबियांनीही शिवसेनेचे आभार मानून या लढयामध्ये शिवसेनेची साथ मिळेल असा विश्वास व्यक्त केला