फलटण : पडक्या मुतारीने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत महिलांनी रविवार पेठ कुंभार टेक येथील असणारी मुतारी बंद करण्यासाठी फलटण नगर परिषदेकडे निवेदन दिले आहे.
रविवार पेठ कुंभार टेक येथे असणारी पुर्वीची मुतारी 4 ते 5 वर्षापुर्वी पडली त्यानंतर नगर परिषदेने तेथे पाईपच्या सहाय्याने तयार केलेली मुतारी बसवली परंतु त्या मुतारीस संरक्षण भिंत नाही त्यामुळे लघुशंकेसाठी जाणार्या माणसांनी पाईप सोडुन इतरञ लघुशंका करण्यास सुरुवात केल्याने त्या परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आणि अंडर ग्राउंड गटाराचे काम सुरु असल्याने ती पाईप पासुन उभी केलेली मुतारीदेखील खाली पाडलेली आहे.त्यामुळे सध्या तेथील नागरिकांचा ञास वाढलेला आहे.कारण येणारे जाणारे नागरिक त्या पडलेल्या भागातच आपला कार्यभाग उरकतात व तेथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.या घाणीमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उदभवला आहे.
त्यामुळे त्या परिसरातील महिलांनी सदरची मुतारी हटवण्याची व परिसर स्वच्छ करण्याची मागणी येथील नागरिकांनी नगर परिषदेकडे केलेली आहे.