सातारा : संपूर्ण देशभर नोटा बंदीबाबत राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक झाली आहे. पण, सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या मोर्चाला अल्प प्रतिसाद लाभला. त्यामुळे दि. 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादीच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल का? या काळजीने राष्ट्रवादी गोटात खळबळ माजली आहे.
आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 50 दिवसांत नोटाबंदीबाबत जनतेला झालेल्या त्रासाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसने 11 वाजता मेळाव्याचे आयेाजन केले होते. पण, कार्यकर्ते जमत नसल्याने अखेर शंभर सव्वाशे कार्यकर्त्यांसोबत हा मोर्चा निघाला. या मोर्चाला शेतकरी संघटनेने मशागत केल्यामुळे थोडी गर्दी जमल्याचे सुख काँग्रेसला मिळाले. या मोर्चाला अल्प प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसचे निरीक्षक तारीक अन्सारी, आ. आनंदराव पाटील, शेतकरी संघटनेचे शंकरराव गोडसे, धनश्री महाडीक यांनी भूमिका मांडली. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी संघटनेचे शेतकरी या मोर्चात सामील झाल्यामुळे चांगलीच घोषणाबाजी झाली. 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादीने नोटाबंदीबाबत आंदोलन करण्याा निर्णय जाहीर केला आहे. पण, सत्तेत रमलेल्या माजी मूख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्याच सातारा जिल्ह्यात काँग्रेसला हात दाखवून अवलक्षण करावे लागले. मुख्यमंत्री असताना चव्हाण यांच्याकडून अनेकांनी अच्छे दिनाफचा लाभ घेतला. ते लाभार्थी कुठेही दिसले नाहीत. तीच अवस्था राष्ट्रवादीच मोर्चाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेत्याचंी घाबरगुंडी उडाली आहे.
या मोर्चापेक्षा डॉ. भारत पाटणकर यांचा माण तालुक्यातील पाणी प्रश्नासाठी झालेलला मोर्च भव्य होता. या मोर्चाला मोठ्या प्रमणात पोलीस बंदोबस्त होता. मोर्चाच्या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कदम, आ. आनंदराव पाटील यांनी शेतकरी संघटनेचे आभार मानून सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले.