सातारा : भाजप सरकारच्या नोट बंदीच्या विरोधात मोठा गाजावाजा करून महामोर्चाचे आंदोलन करणार्या काँग्रेसला किरकोळ मोर्चावर समाधान मानावे लागले. आ. आनंदराव पाटील, विजयराव कणसे, रविंद्र झूटींग यांच्यासह मोजक्या कार्यकर्त्यांनी नोट बंदीबद्दल निवेदन दिले. महामोर्चाचा महाफज्जा मात्र उडाल्याचे यावेळी स्पष्ट झाले. दरम्यान, काँगे्रस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सोमवारी घंटानाद मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन नोट बंदीवर टिकास्त्र सोडले होते.नोट बंदीचा खरमरीत समाचार घेत या विरोधात गरीबांचा कळवळा घेत त्या विरोधात सातार्यात महामोर्चाचे आयोजन करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मोर्चा शुक्रवारी निघणार होता. परंतू आज पर्यंत अनेकवर्षे सत्तेत राहीलेल्या काँग्रस पक्शाला मोर्चा, आंदोलन यशस्वी करण्याचे तंत्र न साधल्याने नोट बंदी माहामोर्चाचा केवीलवाणा प्रयत्न दिसून आला. कार्यकर्ते जमा करण्यात काही वेळ गेला .काँग्रसचे अत्यल्प कार्यकर्ते तर शेतकरी संघटनेच्या शंकरराव गोडसे यांनी आणलेले काही कार्यकर्ते यांच्या जीवावार मोर्चा निघाला खरा पण त्यात फारसा जीव नव्हता. नोट बंदी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रसही दि. 9 रोजी मोर्चा काढणार आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा मोर्चा कसा निघतो याकडे आता सातारकरांचे लक्श लागले आहे.
दरम्यान यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,पंतप्रधान मोदी यांनी सहारा आणि बिर्ला यांच्याकडून घेतलेल्या 65 कोटी रुपयांची चौकशी करावी,सर्वसामान्यांचे नोट बंदीमूळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, कोलकता येथील भाजपच्या बेनामी खात्यात सापडलेल्या पैशाची चौकशी करावी ते पैसे कोणाचे आहेत ते सांगावे,आर्थिक अराजकता निर्माण करण्यास मोदी सरकार जबाबदार असून यापुढे आर्थिक अराजकता निर्माण होणार आहे असे ही निवेदनात म्हटले आहे.
काँगे्रस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सोमवारी घंटानाद मोर्चा काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या मोर्चास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थीत रहाणार आहे.