दुसरी कसोटी : चौथ्या दिवशीच विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी
मँचेस्टर : जेम्स अॅण्डरसन, मोईन अली आणि ख्रिस व्होक्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेत दुसजया कसोटीच्या चौथ्याच दिवशी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडला तब्बल 330 धावांनी विजय मिळवून दिला. सोमवारच्या या विजयामुळे उभय संघात 1-1 अशी बरोबरी झाली.
ओल्ड ट्रॅफोर्डवर विजयासाठी 565 धावांचा पाठलाग करताना पाकचा दुसरा डाव शेवटच्या सत्रात 234 धावांत संपुष्टात आला. अॅण्डरसनने शान मसूद याला कर्णधार अॅलिस्टर कूककरवी पहिल्या स्लिपमध्ये झेल बाद केल्यानंतर अझहर अली याला पायचित केले.
त्याआधी बेन स्टोकच्या चेंडूवर कूकने स्लिपमध्ये झेल सोडल्याने उपाहारापूर्वी युनूस खानला जीवदान मिळाले. स्टोकला एकही बळी मिळू शकला नाही. एकाकी झुंज देणारा मोहम्मद हफीज याने 42 धावांची खेळी केली; पण पराभव वाचविण्यात त्यालाही अपयश आले. गॅरी बॅलेन्सवर मोईन अलीच्या चेंडूवर शॉर्ट लेगवर त्याचा सुरेख झेल टिपला. दुसजया टोकावर संयमी खेळणारा युनूस (28) संघाची पडझड होत असताना एकाकी संघर्ष करीत होता. पण त्याचाही संयम सुटताच मोईनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात सीमारेषेजवळ लाँगऑनवर अॅलेक्स हाल्सकडे त्याने झेल दिला.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव 8 बाद 589 वर डाव घोषित आणि 1 बाद 173 वर डाव घोषित.(कूक नाबाद 76, रुट नाबाद 71) मात पाकिस्तान 198 आणि 234 (हफीज 41,अॅण्डरसन 41/3, व्होक्स 41/3,)
इंग्लंडचा पाकवर 330 धावांनी विजय
RELATED ARTICLES