Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीएहसास मतिमंद मुलांचे बालगृह , वळसे येथे अपंग सप्ताहानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन 

एहसास मतिमंद मुलांचे बालगृह , वळसे येथे अपंग सप्ताहानिमित्त मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन 

सातारा : आज दि. ६ डिसेंबर रोजी जागतिक अपंग सप्ताहानिमित्त एहसास मतिमंद मुलांचे बालगृह , वळसे ,ता. जि. सातारा येथे मुलांच्या मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फुगे फोडणे , डोळे बांधून काठीने मडके फोडणे अश्या प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या . सदर कार्यक्रमासाठी संथापक संजय कांबळे व स्टाफ तसेच मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते .

एहसास मतिमंद मुलांचे बालगृह , वळसे ,ता. जि. सातारा गेली ११ वर्षे अनाथ , निराधार , मतिमंद मुलांसाठी कार्यरत आहे. सदर संस्थेस शासनाचे कोणतेही अनुदान नसून लोक सहकार्य निधीवर मुलांचे पालन पोषण , शिक्षण , प्रशिक्षण देऊन मुलांच्या पुनर्वसनासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करीत आहे .

या बालगृहास सर्वांनी पुढे येऊन मुलांच्या विकासासाठी यथोचित मदत करावी , असे आवाहन करण्यात येत आहे . संपर्क –  9823773901

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular