Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीपाटण कोविड सेंटर येथे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईप मध्ये बिघाड..

पाटण कोविड सेंटर येथे रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईप मध्ये बिघाड..

पाटण:- पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत वस्तीग्रुह येथे असलेल्या कोविड सेंटर मधे सध्या स्थितीत आठ ऑक्सिजन सिलेंडर वर पंचवीस ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे रुग्णांच्या बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने ऐनवेळी येथील चार रुग्णांना कराड व सातारा येथे कोविड सेंटर वर हलविण्यात आले. या सेंटर वर अनेक सुविधांचा अभाव असून ऑक्सिजन पुरवठ्यात तांत्रिक झालेला बिघाड त्वरित दुरुस्त करून ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात यावा.. अशी मागणी होत आहे. सध्या या सेंटर मधे १७ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण दाखल असून ढेबेवाडी कोविड सेंटर वर दोन रुग्ण दाखल आहेत. तर मरळी येथील कोविड सेंटर बंद असल्याचे पाटण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी सांगितले.

कोरोनाचा पादुर्भाव सगळीकडे झपाट्याने वाढत आहे. तशी रुग्णांना बेडचीही कमतरता भासत आहे. वाढत्या कोरोना पादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाचे सर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पाटण तालुक्यातही कोरोनाचा वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कोविड रुग्णांच्या प्राथमिक उपचारासाठी पाटण तालुक्यात गतवर्षी पाटण, मरळी आणि ढेबेवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. या सेंटर मधील पाटण येथे पंचवीस ऑक्सिजन बेड, मरळी येथे पंचवीस ऑक्सिजन बेड आणि ढेबेवाडी येथे साठ ऑक्सिजन बेड ची सुविधा रुग्णांसाठी करुन ठेवण्यात आली आहे. पाटण येथील कोविड सेंटरवर गेल्या दोन -तीन दिवसात २१ कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण दाखल झाले. यामधील चार रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावलेली होती. मात्र ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपला बिघाड झाल्याने या रुग्णांना तातडीने कराड व सातारा येथील कोविड सेंटर वर हालविण्यात आले. पाटण सेंटर वरील ऑक्सिजन पाईपचा बिघाड दुसऱ्या दिवशी ही दुरुस्त झाला नाही. मात्र हा तांत्रिक बिघाड लवकरच सुरळीत करण्यात येईल असे पाटण पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पाटील यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular