Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीपाटण येथे गगनगिरी आश्रमात १ मे पासून ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन ;...

पाटण येथे गगनगिरी आश्रमात १ मे पासून ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन ; १० मे ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण.

पाटण:- शालेय विद्यार्थी – विद्यार्थींनीनां अद्यात्माची आवड निर्माण व्हावी व अद्यात्मात त्यांचा सहभाग वाढावा तसेच ज्ञानेश्वरी महाराज आणि प.पू. गगनगिरी महाराज यांच्या कार्याचा अभ्यास या विद्यार्थ्यांना व्हावा या उध्दात हेतूने स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम पाटण येथे बुधवार दि. १ मे ते मंगळवार दि. १० मे २०१९ अखेर श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. तसेच गुरूवार दि. ९ मे रोजी गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक आणि शुक्रवार दि. १० मे रोजी आशिष महाराज यांच्या हस्ते गगनगिरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा पाटण व पंचक्रोशीतील शालेय विद्यार्थी – – विद्यार्थींनीनी, नागरीकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम पाटण यांनी केले आहे.

या सप्ताह काळात दररोज काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, प्रवचन, हरीपाठ, कीर्तन व हरीजागर होणार आहेत. सप्ताहकाळात लुगडेवाडी, धारेश्वर दिवशी, येरफळे, येराड, कडवेकर, सणबूर येथील प्रवचने, सोनवडे, तामकणे, नाडोली, काळोली, आरेवाडी, कवरवाडी, सणबूर, शेनवडीकर येथील कीर्तने आणि पाटण, येरफळे, खिवशी, घाणव, नाडोली, काळोली, म्हावशी, रामापूर पाटण, त्रिपुडी, मुळगाव, कवरवाडी, नावडी, तामकणे, अडूळ, सोनवडे येथील हरीजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
गुरूवार दि. ९ रोजी सकाळी प. पू. गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची पाटण-मणदुरे रोड ते प. पू. गगनगिरी सेवा आश्रम पाटण अशी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार दि. १० रोजी दुपारी आशिष महाराज यांच्या हस्ते प. पू. स्वामी गगनगिरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन होणार आहे. याच दिवशी शुक्रवारी सप्ताहाची सांगता होणार असून सकाळी दिंडी सोहळा, काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात सहभागी होवून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प. पू. स्वामी गगनगिरी महाराज सेवा आश्रम पाटण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular