सातारा ः येथील मंगळवार पेठेतील ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मंदिरात ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज याचा निर्वाण दिन अर्थात पुण्यतिथी उत्सव आज पहाटे भावीकांच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. मागील रविवार दि. 23 डिसेंबर पासून येथे हा दहा दिवसांचा पुण्यतिथी महोत्सव सुरु होता. आज सोमवारी दि. 31 डिसेंबरला या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने पहाटे काकड आरती झाल्यावर 5 वाजून 55 मिनीटांनी या मंदिरात गुलाल फुले उधळण्याचा कार्यंक़्रम संपन्न झाला.
पहाटे मंदिरातील महारजांची पुजा झाल्यावर कृष्ण तुळशीचा हार मूर्तीला घालण्यात आला होता. यामुळे महाराजांची मूर्ती अधिकच लोभस दिसत होती.पानस्कर गुरुजीच्या हस्ते काकड आरती झाल्यानंतर उपस्थित शेकडो भावीकांनी गुलाल मिश्रीत फुले व तुळशी दले वाटण्यात आली. त्यानंतर महाराजांचे निर्वाण काळापूर्वी मांर्गदर्शन करणारे प्रवचन वाचन झाले त्यानंतर ..श्रीराम जयराम जय जय राम.. या तेरा अक्षरी रामानामाचा सामुदायिक जप करण्यात आला त्यानंतर अगदी निर्वाण काळी म्हणजेच पाच वाजून 55 मिनीटांनी केवळ श्रीराम, श्रीराम असा जप करत दोन मिनीटे स्तब्धता पाळण्यात आली त्यानंतर अगदी शिस्तीने उपस्थित भावीकांनी महाराजांचे चरण पादुका वर गुलाल पुष्पदले अर्पण केली.त्यानतंर उपस्थितांना लेाणीसाखर आणि पंचामृत वितरीत करण्यात आले.पहाटे महाराजांच्या लाडक्या बताशा घोड्याचे रुप म्हणुन मंदिराबाहेर तगडा पांढरा घोडा आाण्यात आला होता. भावीकांनी त्याचेही दर्शंन घेतले.मंदिारत दिवसभर रामानाम जप करण्यासाठी रात्री उशीरा पयर्ंंत भावीकांनी गर्दी केली होती. दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत महाप्रसाादाचे आयेाजन करण्यात आले होते त्यात शेकडो भावीकांना अन्नप्रसाद ग्ऱहणकेला. मंदिराला पुण्यतिथीनिमित्त विशेष विद्युत रोषणाई करण्यात आली होती. अशी माहिती या मंदिराचे विश्वस्त व मठाधिपती अशोकभाऊ पानस्कर गुरुजी यांनी दिली.
या मंदिरात 5 ऑक्टोबर 2002ला ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांच्या अतिशय सुरेख अश्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर येथ अखंड सेवा सुरु असून महाराजांच्या कृपेनेच येथे सामुदायिक असा तेरा कोटी रामनाम जप कार्यंक़्रम आजपर्यर्त 3 वेळा संपन्न झाला आहे. येथे दर पौर्णिमेला मोफत वैद्यकिय शिबीरही आयोजीत केले जाते. या मंदिराशी संलग्न अशा साई चैतन्य शैक्षणिक व वैद्यकिय सेवा संस्थेतर्फे नियोजीत उपक्रमात हॉस्पिटल उभारण्याचा मानस असून गरजूंच्या कल्याणासाठी ही संस्था सदैेव सेवा देत आहे. मागील 15 वर्षात या संस्थेने आजपयंर्ंंत अनेक मोफत रोग निदान शिबीरे घेतली होती. महागाईच्या काळात गोरगरीबांनी वैद्यकिय सेवा परवडत नसल्याने संस्थेने ही सेवा आता अल्प दरात देण्याचे ठरविले आहे. यासाठी 20 ते 30 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल सुरु कण्याचा मानस असून निधी उभारण्यासाठी सर्व दानशूर,नामवंत उद्योजक व्यक्ति व संस्थांना या साठी ऐच्छिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. ही संस्था 80 जी कलमानुसार प्रमाणित असून त्याचा नंबर झक/उखढ-111ढएउक/80ॠ/164/ 2009/10असा आहे. या कलमाद्वारे देणगी देणार्यास आयकरातुन कर माफ आहे. तरी साई चैतन्य वैद्यकिय सेवा संस्था सातारा या संस्थेच्या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या सातारा शाखेच्या बँक खाते क्रमांक 345601000466 वर आपली मदत चेक किंवा डी.डी. द्वारे जमा करावी याची रितसर पावती देण्यात येईल असे आवाहन यावेळी आवाहन पानस्कर गुरुजींनी केले .पुण्यतिथी उत्सवाचे संयोजनात मंदिराचे विश्वस्त स्वागत काशिद, विनोद काशीद,अंबादास महाडिक, अभिॅजीत पानस्कर, चंदाताई मानस्कर, अलका नाफड यांनी केले होते.
सगुण रुप ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मंदिरात पुण्यतिथी सोहळा साजरा; गोरगरिब रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी मदतीचे आवाहन
RELATED ARTICLES