सातारा : सातारा शहरामध्ये गेली अकरा वर्षे सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणारा माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशन ट्रस्ट समाजातील वंचितासाठी अनमोल असे मदत कार्य करत आहे. या ट्रस्टतर्फे गेली पाच वर्षे सातारा शहरातील आनंदाश्रम या वृध्दांचे संगोपन करणा-या संस्थेतील दोन वृध्दांना दत्तक घेऊन त्यांचा संपूर्ण खर्च हा ट्रस्टतर्फे करत आहेत. या वृध्दांसाठी आवश्यक वस्तू, धान्य, कपडे व जीवनाश्वयक वस्तूंचा दान कार्यक्रम नुकताच आनंदाश्रमात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुर्यवंशी, माहेश्वरी ट्रस्टचे माधव सारडा आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री. सुर्यवंशी यांच्याहस्ते दत्तक आजी आजोबांसाठी वस्तूंची देणगी आनंदाश्रमाचे अध्यक्ष डॉ. शाम बडवे व दिलीप पाठक यांच्याकडे सूपूर्द करण्यात आली. यावेळी बोलताना श्री. सूर्यवंशी म्हणाले, माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशन करत असलेल्या कार्याचे कौतुक करताना आजच्या धावपळीच्या युगात आपला व्यवसाय, उद्योग सांभाळून समाजासाठी उपयुक्त व योग्य असे काम करणा-या सर्व पदाधिका-यांना धन्यवाद दिले. आज समाजाता स्वार्थीवृत्ती वाढत असताना माहेश्वरी ट्रस्टचे कार्यकर्ते समाजातील गरजू लोकांना स्वतःच्या खर्चाने अनेक प्रकारची मदत करत आहेत हे पाहून समाधान वाटले. यावेळी त्यांनी ट्रस्टला शुभेच्छा दिल्या.
प्ररंभी माहेश्वरी ट्रस्टचे माधव सारडा यांनी ट्रस्टच्या गेल्या 11 वर्षातील कार्याचा आढावा घेतला. यामध्ये सातारा सिव्हील हॉस्पिटल येथे दररोज दुपारी 12 वाजता रुग्ण नातेवाईकांना जेवण, निराश्रीत लोकांना आधार देऊन पुर्नवसन करणे, थंडीमध्ये रात्री 12 वाजता रस्त्यावर उघडयावर झोपणा-या लोकांना ब्लँकेटचे वाटप, आनंदाश्रमातील वृध्दांना दत्तक घेऊन दैनंदिन वस्तूंची देणगी अशा कार्यक्रमांची माहिती सांगितली. तसेच प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतीदिनानिमित्त सदर संस्थेला दुपारी एक वेळच्या जेवणाचे 3000 रुपये किंवा गोड जेवणाचे 3500 रुपये देऊन सदर अन्नछत्र सतत कार्यरत ठेवण्यास मदत करावी.
डॉ. शाम बडवे यांनी आनंदाश्रमाची माहिती सांगितली. श्री. दिलीप पाठक यांनी प्रास्ताविक व आभार मानले. माहेश्वरी ट्रस्टतर्फे व आनंदाश्रमातर्फे श्री. सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. माहेश्वरी फौंडेशन ट्रस्टतर्फे आनंदाश्रमांच्या पदाधिका-यांचाही सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आनंदाश्रमातील सर्व आजी आजोबा, डॉ. अरविंद काळे, माहेश्वरी फौंडेशन ट्रस्टचे अध्यक्ष हरिनारायण कासट, सचिव दिलीप लोया, खजिनदार उज्वल सारडा, पदाधिकारी विनोद राठी, राधेशामजी भंडारी, प्रकाशजी मंडोरे, राजगोपाल चांडक, राजू कासट, मुकुंद लाहोटी, नरेंद्र मिणियार, प्रमोद लाहोटी, श्रीराम सारडा, जितेंद्र भंडारी, श्रीनिवासजी झंवर उपस्थित होते. तसेच सर्व माहेश्वरी महिलाही उपस्थित होत्या. माहेश्वरी ट्रस्टतर्फे सर्वांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माहेश्वरी चॅरिटेबल फौंडेशन ट्रस्टतर्फे सलग सहाव्या वर्षी आनंदाश्रमात दत्तक आजोबा उपक्रम
RELATED ARTICLES