फलटण : महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गायीच्या दुधाला 27 रुपये दर दिला जात नाही. याबाबत हेरिटेज प्रशासनाला आम्ही लेखी 31 ऑक्टोबर रोजी निवेदनही दिले होते. मात्र, आठ दिवस झाले तरी अजून निर्णय घेतला जात नाही. सोमवारी हेरिटेज प्रशासनाने पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. याचा आम्ही शेतकरी व दूध उत्पादक निषेध करीत असून दूध दरवाढ घेतल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते खंडू करचे यांनी सांगितले आहे.
याबाबतचे निवेदन प्रांत संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील व पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश चोपडे यांना दिले आहे.