मुंबई : जीएसटी विधेयकाला महाराष्ट्र विधीमंडळानेही एकमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विधेयकाला मंजुरी देणारं महाराष्ट्र नववं राज्य ठरलं आहे.
जीएसटी विधेयकासाठी राज्य विधीमंडळाचं आज विशेष अधिवेशन भरवण्यात आलं आहे. त्यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची भूमिका मांडली. राज्यांच्या अधिकारावर गदा येऊ नये, महापालिकेच्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, या आणि अशा विविध सूचना काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या. याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचं कोणतंही नुकसान होणार नाही, महापालिकांची भरपाई तातडीने देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर एकमताने हे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं