सातारा : सातारा हा क्रांतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. क्रांतिसिंहनाना पाटील यांच्यासारखे अनेक क्रांतिकारक जिह्यात होवून गेले. क्रांतीची सुरुवातही साताऱयातून होते. देशसेवेसाठी आजही जिह्यातील प्रत्येक गावातील किमान एक जवान कार्यरत आहे. अनेक जवानांनी देशासाठी आपले प्राण दिले आहेत. असे असतानाच जिह्याचे सुपूत्र कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव काकांना सुखरुप परत आणाफ, असे साकडेच येथील गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्रे लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते इंग्रजांच्या कालखंडामध्येही अनेक माणसं या साताऱयात होवून गेली. स्वराज्य घडविण्यापासून देशसेवेसाठी त्यांची मोठी कामगिरी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी ब्रिटीश सरकारला पत्रिसरकार काढून सळो की पळो करुन सोडले होते. शहीद कर्नल संतोष महाडिक यांनीही देशासाठी आपले प्राण दिले. अजमल कसाबला जिवंत पकडून देणारे तुकाराम ओींबळेसुद्धा याच मातीतील. सैनिकी सेवा केलेले कुलभूषण जाधव हे धडाडीचेच अधिकारी होते. सेवानिवृत्तीनंतर ते व्यवसाय करत होते. त्यांना गतवर्षी पाकिस्तानाने पकडले. त्यांची कसल्याही परिस्थितीत सुखरुप सुटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करावी यासाठी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी एकसाथ पत्र लिहिली आहेत. गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी मांडलेली संकल्पना विद्यार्थ्यांनी पुरेपुर उतरवली असून यामध्ये पहिली ते 9 वीच्या 1100 विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात पत्र लिहिली. यावेळी संजय कदम, माध्यमिकच्या मुख्याद्यापिका लीना जाधव, प्राथमिकच्या मुख्याद्यापिका शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, पर्यवेक्षक मोहन बेदरकर, सहपर्यवेक्षक सोनाली तांबोळी यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने पकडून ठेवले आहे. असं कळले की त्यांना फाशी देणार आहे. माननीय मोदीजी तुम्ही सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानापासून ते प्रत्येक अभियानात मी सहभाग घेतो. तुम्ही सांगाल त्या देशभक्तीच्या कोणत्याही योजनेत झोकून देवून काम करतो. मी सैनिक म्हणून काम करेन, पण आमच्या सातारच्या कुलभूषण काकांना परत सोडवून आणाल. असे या विद्यार्थ्यांचे शब्द त्या पत्रावर आहेत. या विद्यार्थ्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे.