Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीमोरणा गुरेघरच्या कालव्यांसाठी जमिन गेलेल्यां 289 खातेदारांना मिळणार 8 कोटी 87 लाख...

मोरणा गुरेघरच्या कालव्यांसाठी जमिन गेलेल्यां 289 खातेदारांना मिळणार 8 कोटी 87 लाख रुपये ; आ. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश


सातारा : महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अख्त्यारित मोरणा गुरेघर या मध्यम धरण प्रकल्पाचे काम पुर्णत्वाकडे गेले असून धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूस जमिन क्षेत्रास धरणातील पाणी देणेकरीता कालव्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये धरणाच्या डाव्या कालव्याकरीता संपादन करण्यात आलेल्या जमिनींचा दर हा येथील बाधित खातेदारांना रेडीरेकनर प्रमाणे देण्याचे शासनाने ठरविले होते परंतू ही रक्कम कमी असून यामध्ये वाढ करुन या बाधित खातेदारांना शासनाने किमान पाच पटीने जमिन संपादनाचा मोबदला दयावा याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्यास यश प्राप्त झाले त्यामुळेच डाव्या बाजूच्या कालव्यासाठी जमिन संपादित करावयाच्या एकूण 289 बाधित खातेदारांना आता रेडीरेकनरच्या पाच पटीने म्हणजेच 8 कोटी 83 लाख 55 हजार एवढी रक्कम ही आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळेच मिळणार आहे.या निर्णयाबद्दल या बाधित खातेदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे आभार व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ अख्त्यारित मोरणा गुरेघर या मध्यम धरण प्रकल्पाचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे. धरणामध्ये आवश्यक असणारा पाणीसाठाही करण्यास धरण व्यवस्थापनाकडून सुरुवात करण्यात आली आहे.धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या जमिन क्षेत्रास धरणातील पाणी देणेकरीता उजव्या बाजूस 30 किमी व डाव्या बाजूस 17 किमी कालव्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये उजव्या बाजूस 30 किमी कालव्याचे काम केले तरी उजव्या बाजुच्या गांवामधील शेतामध्ये डोंगंर पायथ्यापर्यंतच्या जमिन क्षेत्रास या कालव्याच्या माध्यमातून पाणी जात नसल्याने याचा फेरसर्व्हे करुन कालव्या एैवजी उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून शेतक-यांच्या शेतीला पाणी दयावे याकरीता आमदार शंभूराज देसाई हे सातत्याने शासनाकडे आग्रही राहिले.आमदार शंभूराज देसाई यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आमदार शंभूराज देसाई मागणी करीत असलेल्या कामांसंदर्भात फेरसर्व्हे करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिल्या.कार्यकारी संचालक यांनी जलसंपदा मंत्री यांचे सुचनेवरुन सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता यांच्या देखरेखीखाली नुकताच याचा फेरसर्व्हे पुर्ण केला असून यामध्ये उजव्या बाजूस केवळ पाच किमी कालव्याचे काम करुन पुढील भागास डोंगरपायथ्यापर्यंत शेतीला उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी देण्याचे ठरविण्यात आले असून अशाप्रकारचा प्रस्ताव शासनाच्या जलसंपदा विभागाकडे मान्यतेकरीता सादर करण्यात येणार आहे.जलसंपदा विभागाकडून लवकरच या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता असून या मान्यतेमुळे धरणाच्या उजव्या बाजुचे डोंगर पायथ्यापर्यंतचे सुमारे 800 हेक्टर जमिन क्षेत्र जादा ओलिताखाली येणार आहे.हे आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याचे यश आहे.दरम्यान धरणाच्या डाव्या बाजूस डावा कालव्याकरीता करण्यात येणा-या मौजे कोकीसरे, आडदेव बु//, चोपडी, बेलवडे खुर्द,आंब्रग जलसेतू,आंब्रग कालवा व धावडे  या गांवातील आवश्यक जमिन क्षेत्राचे संपादनामध्ये संबधित बाधित खातेदारांना शासनाने रेडीरेकनर प्रमाणे देण्यात येणारा जमिनीचा मोबदला हा पाच पटीने करावा व त्याप्रमाणे बाधित खातेदारांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ सातारा यांनी वाढीवचा मोबदला दयावा अशी आमदार शंभूराज देसाईंची शासनाकडे मागणी होती. आमदार शंभूराज देसाईंच्या या सातत्याच्या मागणीमुळे सन 2017  सालच्या रेडिरेकनर वर आधारित नवीन दराने 5 पटीने पुन्हा नव्याने यासंबधीचे प्रस्ताव हे जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे सादर करावेत असे शासनाकडून पाटबंधारे विभाग,सातारा यांना सुचित करण्यात आले होते पाटबंधारे विभागाच्या प्रस्तांवानुसार जिल्हाधिकारी सातारा यांनी दि.31.08.2017 चे पत्रान्वये सुधारित मुल्यांकन प्रस्तावास मान्यता दिली असून त्यानुसार बाधित खातेदारांचे दस्त करुन जमिनीचा मोबदला देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.वरील मौजे कोकीसरे,आडदेव बु//,चोपडी, बेलवडे खुर्द, आंब्रग जलसेतू,आंब्रग कालवा व धावडे  या सात गांवामध्ये एकूण 36.5013 हेक्टर जमिन क्षेत्र संपादित करावयाचे असून नवीन मुल्यांकन प्रस्तावानुसार म्हणजेच रेडीरेकनरच्या पाच पटीने 8 कोटी 83 लाख 55 हजार एवढी रक्कम ही या सात गांवातील 289 बाधित खातेदारांना आमदार शंभूराज देसाईंच्या विशेष प्रयत्नामुळे मिळणार आहे.दस्त करुन मोबदला देण्याची प्रक्रिया संबधित यंत्रणेने सुरु केली आहे. 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular