म्हसवड : म्हसवड येथील चौपदरी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विजेच्या खांबाचा धक्का लागून मृत्त्यु झालेल्या आकाश देवकर यांच्या वडील मोहन देवकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पालकमंत्री विजय शिवतारे यांचे हस्ते एक लाख रूपायांचा धनादेश देण्यात आला.
म्हसवड शहरातील चौपदरी रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या लाईटच्या पोलला शॉक लागून मृत्यू झालेला शिवसैनिक आकाश( दत्ता)मोहन देवकर याचे वडील मोहन देवकर यांना शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख मा.नितिन बानुगडे-पाटील यांच्या सहकार्याने व जिल्ह्याचे पालकमंत्री मा.विजयबापू शिवतारे,मा.रणजितसिंह देशमुख , शिवसेनेचे शहरप्रमुख राहूल मंगरूळे यांच्या प्रयत्ना मुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून एक लाख रूपये नुकतेच मंजुर झाले होते.
बांधकाम विभागाने म्हसवड शहरात दिड किलो मिटरचा चौपदरीकरण रस्ता रुंद केला होता त्या रस्त्याच्या मध्य भागी दुभाजक उभे केले होते त्या दुभाजका मध्ये आकर्षक अशी लाईटचे पोल उभे केले होते त्या मुळे शहराला वेगळेपण आले होते . या खांबाचा शॉक लागल्याने आकाश देवकर चा मृत्त्यु झाला होता. आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ऐन 21वर्षात गेल्याने आई वडिलांचा संभाळ करणारा वा कमावती व्यक्ती गेल्याने आकाश याचे आई वडिल उपास पोटी आपले जिवन जगत होते शिवसेनेचे शहर अध्यक्ष राहुल मंगरूळे तसेच युवासेनेचे शहराध्यक्ष सोमनाथ कवी यांनी गेले एक वर्ष याचा पाठपुरावा केल्या नंतर देवकर कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन एक लाख रूपये मंजुर झाले होते.
मोहन देवकर यांना हा धानांदेश मा.पालकमंत्री विजय शिवतारे यांचे हस्ते एक लाख रूपायांचा धनादेश देण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांतदादा जाधव, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपजिल्हाप्रमुख मा.संजय भोसले, तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, शहरप्रमुख राहुल मंगरुळे, युवा सेना शहराध्यक्ष सोमनाथ कवी, ग्राहक संरक्षण उपशहर कक्षप्रमुख आदित्य सराटे आदी उपस्थित होते.
देवकर कुटुंबाला मदतीचा धनादेश देताना पालकमंत्री विजय शिवतारे, चंद्रकांत जाधव, श्वेता सिंघल व इतर.