साताराः कायदेशीर व न्याय गोष्टींची विचारणा करणे हा भारतीय राज्यघटनेने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क बजावणार्या संवेदनशील नागरिकास पोलिसानी कारणाशिवाय जबाबास बोलावणे हा उघड उघड अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन सातारा येथील परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती च्या कार्यकर्त्यांनी सातारा येथील पोलीस अधीक्षक संदीप पाटील याना समक्ष भेटून दिले .
यासंदर्भातील माहिती अशी कि जवाब दो या डॉ नरेंद्र दाभोलकर व कौ गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबत प्रश्न विचारण्यासाठी काही सामाजिक संघटनांनी 20 जुलै ते 20 ऑगस्ट या दरम्यान हॅशटॅग ऑनलाइन आंदोलन सुरु केले . त्यात अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस व मुख्यमंत्र्याना टॅग केले होते .त्यामध्ये सातारा येथील विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे तरुण कार्यकर्ते व तरुण डॉक्टर अरुण पवार यांनी सुद्धा या मोहिमेचा भाग म्हणून 25 जुलै रोजी दाभोलकर , पानसरे , कलबुर्गी ह्या यादीत आणखी भर व्हावी अशी सरकारची इच्छा आहे का ? खुन्यांचा शोध न लागण्याचे कारण काय? असा प्रश्न विचारला आहे तसेच : निधड्या छातीवरी जेंव्हा गोळ्या त्यांनी झाडल्या . चार वर्षे सारली तरी बेड्या का नाही पडल्या ? अशी एक छोटी चित्र इमेज ट्विटर वॉर पोस्ट केली होती . यावर याप्रकरणी सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस यांनी 31 ऑक्टोबर 2017 रोजी फोन करून जवाब नोंदवायला बोलावले त्याप्रमाणे डॉक्टर अरुण पवार यांनी जाऊन जबाब नोंदवला पण संबंधित अधिकारयाकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही याउलट डॉक्टर अरुण पवार यांचीच व्यक्तिगत आणि कौटुंबिक चौकशी पोलीस अधिकार्याने केली हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले
निवेदन देताना सिटू चे कौ वसंतराव नलावडे, कौ सलीम आतार, मिनाज सय्यद अनिल मोहिते, संत रोहिदास सामाजिक सेवा संशेचे अध्यक्ष गणेश कारंडे, बाळासाहेब सावंत, तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, प्रा युवराज जाधव, महेश गुरव तसेच डॉ. अरुण पवार हे उपस्थित होते . यासंदर्भात यापुढे काळजी घेतली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिष्टमंडळास दिले .