हैदराबाद : 25 जून 1983 या दिवशी लंडनच्या लॉर्ड मैदानावर क्रिकेटमधील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद झाली. आधीचे दोन्ही विश्वचषक जिंकून क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणारा क्लाईव्ह लॉईडचा संघ भारतीय टीमला नेस्तनाबूत करण्यास सज्ज होता. स्पर्धेचा अंतिम सामना म्हणजे केवळ एक औपचारिकता, विंडीज हॅट्टि्र्क करणार, असाच अंदाज कित्येक क्रिकेट एक्सपटर्सनी लावला होता. केवळ नशिबानेच भारत अंतिम फेरीत पोहोचला आहे, अशी हेटाळणीही केली गेली. शेवटच्या क्रमांकावरील भारत आणि विश्वविजेता वेस्ट इंडीज यांच्यातील लढत म्हणजे गोष्टीतील ससा आणि कासव यांच्यातील शर्यत वाटत होती; पण इथेही कासवच जिंकले.
त्यावेळी सामने 60 षटकांचे होत असत. भारताने प्रथम फ़लंदाजी करताना 54.4 षटकात सर्व बाद 183 धावा केल्या. श्रीकांतने सर्वाधिक 82 चेंडूत 38 धावा केल्या होत्या तर अमरनाथने 26 धावा केल्या. संदीप पाटीलच्या 27 धावांच्या खालोखाल 20 धावा ह्या अवांतर होत्या. 60 षटकांत 184 धावांचे आव्हान विंडिज संघ सहज पार करेल अशीच अपेक्षा सर्वांना होती. पण जिद्दीने खेळ करण्यावर अधिकाधिक भर देणार्या भारतीय टीमने सुरूवातीलाच जो धक्का दिला त्यातून कॅरेबियन संघ अखेरपर्यंत सावरला नाही.
विंडीजच्या 50 धावसंख्येवर कपिल देवने राक्षसी खेळी करण्यासाठी प्रसिद्ध असणार्या सर व्हिव्हियन रिचर्डसचा अविश्वसनीय झेल घेतला आणि त्यानंतर विंडीजच्या पडझडीला सुरूवात झाली, मग काय? संधू यांनी इनस्विंगरवर गˆीनिज यांचा त्रिफळा उडवला आणि मैदानात एकच जल्लोष साजरा झाला.
मदनलालच्या गोलंदाजीपुढे डेसमंड हेन्स, गोम्स सारखे सगळेच वीर धारातिर्थी पडले, उरलेल्या काहीजणांना अमरनाथ व संधूने गुंडाळले. भारताच्या अचूक गोलंदाजीपुढे कॅरेबियन फलंदाजी क्षणाक्षणाला ढेपाळत गेली आणि ही पडझड थेट सर्व बाद 140 पर्यंत जावून थांबली.
अशाप्रकारे 25 जून 1983 रोजी भारताने विश्वचषक जिंकला तोही क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्डवर…! क्रिकेटचा शोध लावणार्या इंगˆजांच्याच भूमीत.
1983 ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले.
भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑॅस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली. अंतिम सामन्यात दिग्गज वेस्ट इंडीजला पाणी पाजले आणि भारताचा कर्णधार कपिल देव यांनी विश्वचषक उंचावला.
माझ्या मुलाखतीसाठी गांगुली उपस्थितच नव्हता, रवी शास्त्री
मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा उमेदवार निवडण्यासाठी बीसीसीआयच्या चार सदस्यांनी मुलाखती घेतल्या. यामध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली आणि संजय जगदाळे यांचा समावेश होता. मात्र माझी मुलाखत घेण्यासाठी गांगुली उपस्थितच नव्हता, असा खुलासा रवी शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला आहे.
रवी शास्त्रींची मुलाखत व्हिडिओ लिंकद्वारे संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत झाली. मुलाखत घेण्यासाठी सचिन स्काईपद्वारे लंडनहून सहभागी होता. जगदाळे आणि लक्ष्मण हे दोघे ताज हॉटेलमध्ये होते. तर गांगुली कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयातून सहभागी होता. मात्र, शास्त्री यांच्या मुलाखतीवेळी गांगुली कोलकाता क्रिकेट असोसिएशनच्या एका बैठकीमध्ये होता, जी बैठक साडे 6 वाजता संपली. गांगुलीने संपूर्ण मुलाखतीत एकही प्रश्न विचारला नाही, असं शास्त्री यांनी सांगितलं.
निवड न झाल्यामुळे नाराज
प्रशिक्षकपदी निवड न झाल्यामुळे आपण नाराज असल्याचंही शास्त्री यांनी सांगितलं. भारतीय संघासोबत गेल्या 18 महिन्यांपासून भारतीय संघासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. भारतीय संघाला सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये वरचं स्थान मिळालं आहे.
भारतीय संघाचे खेळाडू आणि सर्व स्टाफ यांच्याशी चांगले संबंध झाले होते. भारतीय संघाला गेल्या 18 महिन्यात मिळालेल्या यशाचा अभिमान आहे, असं शास्त्री यांनी सांगितलं