सातारा :- इनरव्हील क्लब , सातारा ही संस्था गेल्या 58 वर्ष सातारा शहर व परिसरात समाजसेवेचे काम करीत आहे. सन 2024-2025 मध्ये जागतिक पातळीवर संस्था 100 वर्षात पदार्पण केलेलेआहे. या संस्थेने गेले 58 वर्षात सातारा जिल्ह्यातील नागरीकांचे जीवनात समाजसेवेची जागरुकता निर्माण केल्याने नागरीकांचे जीवनमान , विचार पद्धती उंचावण्यास निश्चित मदत झाली आहे. संस्थेकडून भविष्यातही असेच लोकोपयोगी सामाजिक कार्य होत राहील. असे संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीतर्फे या पदग्रहण समारंभाप्रसंगी सांगण्यात आले .
दर वर्षी प्रमाणे या वर्षीही क्लबचा पदग्रहण समारंभ रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी अध्यक्ष म्हणून चंद्रिका उपाध्याय , उपाध्यक्षा सोनाली दोशी, सेक्रेटरी – रुपाली जगताप , जॉईंट सेक्रेटरी शिल्पा गांधी, ट्रेझरर- ॲड. अरुंधती अयाचित, जॉईंट ट्रेझरर रुपाली गुजर, आयएसओ – नंदिनी जगताप, एडिटर – वंदना शाह, जॉईंट एडिटर नमिता हुम्बरे यांची निवड करण्यात आली. तसेच सी सी पोस्ट वंदना देसाई व ई सी सदस्य म्हणून माजी अध्यक्षा नीलिमा खांडके,बिना शहा, स्वरूपा पोरे , सुप्रिया ओक, मदिना पटेल,वैशाली सांगळे, यांची निवड झाली. तसेच स्पेशल ऍडव्हायजर म्हणून शकुंतला कासट यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नेहा पाटील , प्रोफेसर वाय. सी. कॉलेज, सातारा या उपस्थित राहिल्या. सर्व क्लबचे सदस्य कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने उपस्थित होते.
डॉ . नेहा यांनी महिला सबलीकरणासाठी काही मुद्दे नमूद केले. त्यात महिलांनी आर्थिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक, सामाजिक सक्षम असले पाहिजे या महत्त्वाच्या मुद्यावर भर दिला. महिलांनी महिलांनाच आधी प्रोत्साहन दिले पाहिजे व कसे हे उदाहरणासह स्पष्ट केले. सतत कार्यमग्न राहा, असा ही मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
याच वेळी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस क्लबच्या विद्यमान अध्यक्षा चंद्रिका उपाध्याय यांनी व्यक्त केला. अशी माहिती क्लब च्या माजी अध्यक्षा नीलिमा खांडके यांनी दिली.