सातारा : एड्स व मौखिक आरोग्या विषयी जनजागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणांबरोबर सामाजिक संस्था, महाविद्यालये, शाळा यांचा सहभाग घेवून युवा वर्गात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात आज जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल बोलत होत्या. यावेळी सातारच्या नगराध्यक्ष माधवी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, न्यायाधीश श्रीमती ए.एस. वैरागडे, न्यायाधीश के.के. पाटील, न्यायाधीश श्रीमती व्ही.जे. जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार आदी यावेळी उपस्थित होते.
एड्सचे प्रमाण 2005 नंतर खूप कमी झाले आहे. एड्सची टक्केवारी ही 1 वर आली आहे. मौखिक आरोग्य व एड्स विषीय जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेने या आठवड्यात प्रत्येक शाळेत शिबीरांचे आयोजन करुन मुलांमध्ये जनजागृती करावी. कर्करोगामुळे एखाद्याचे आयुष्य संपून जाते. कर्करोगाविषयी ग्रामीण भागातील महिलांमध्ये जानजागृती करावी. एड्स व मौखिक आरोग्य या विषय शाळेमध्ये निबंध, चित्रकला तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करावे. यामध्ये नागरिकांबरोबरच सामाजिक संस्थांचाही सहभाग घ्यावा.मेढ्याच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. यावेळी रजिस्टर चेक केले असता महिलांच्या प्रसुती होण्याचे प्रमाण खूप कमी आढळले. तसेच ओ.पी.डी. ची संख्याही अतिशय नगण्य होती. हे प्रमाण वाढविण्यासाठी एनआरएचएमच्या माध्यमातून खासगी डॉक्टरांना चांगले मानधन देण्यात येणार आहे. हे मानधन मोठ्या रकमेत असणार आहे. यासाठी लवकरच जिल्ह्यातील डॉक्टरांची बैठक घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी कैलास शिंदे म्हणाले, एडसचे प्रमाणे 24 टक्क्यांवरुन आज 1 टक्यावर आले आहे. यातून आपल्याला एक बोध मिळतो की एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपण काहीही करु शकतो. दि. 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत मौखिक आरोग्याबाबत शासनामार्फत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. कुठलाही शासकीय कार्यक्रम हा लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होत नाही. या कार्यक्रमामध्ये सामाजिक संस्थांबरोबर गावांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणार्या सामाजिक संस्था व गावांना पारितोषिके दिली जाणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. सध्या आपले जीवन प्लॅस्टीकमय झाले आहे. यामुळे जीवनसृष्टीला हानी पोहचत आहे. राज्य शासनाने प्लॅस्टीक बंदीचा कार्यक्रम हाती घेतला आहे प्लॅस्टीक बंदी कार्यक्रम सातारा जिल्ह्यात एक चळवळ म्हणून राबवूया यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.
शासनाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सातारा नगर परिषद सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन नगराध्यक्ष माधवी कदम यांनी यावेळी दिले. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय येथे एड्स जनजागृती रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलिला जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. या कार्यक्रमास नर्सींग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एड्स व मौखिक आरोग्या विषयी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी : जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES