सातारा : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील वाल्मिकी पठारावरील घोटील वरचे येथे सोमवारी दि.27 नोव्हेबंर ला मध्यरात्री 01.00 वा चे सुमारास शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत जळीतग्रस्त झालेल्या 6 कुटुंबाची आमदार शंभूराज देसाई यांनी भेट घेवून त्यांना आमदार शंभूराज देसाई यांनी वैयक्तीक व शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने निवा-यासाठी 6 पेटया पत्रा व भेटीदरम्यान शंभूराज युवा संघटनेच्या वतीने आर्थिक मदत दिली. व दुस-या दिवशी तातडीने प्रातांधिकारी, तहसिलदार, वीज वितरण कंपनीचे संबधित अधिकारी यांची बैठक घेवून त्यांनी या कुटुंबाला तातडीची धान्याची मदत तसेच आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याने वीज वितरण कंपनीच्या वतीने त्यांना मदत करणेसंदर्भात तसेच गटविकास अधिकारी यांना या कुंटुबांना घरकुल योजना मंजुर करणेसंदर्भातील प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सुचना त्यांनी संबधितांना दिल्या. दरम्यान सुमारे 20 ते 21 लाख रुपयांचे नुकसान झालेल्या या 6 कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाययता निधीतून जास्तीची मदत मिळावी याकरीता त्यांनी तातडीने मुख्यमंत्री यांना पत्रही दिले असून येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेवून ही मदत तात्काळ करावी अशी मागणी करणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले आहे.
वरचे घोटील हे गांव ढेबेवाडी पासून सुमारे 25 किमी अंतरावर आहे. सोमवारी दि.27 नोव्हेबंर ला मध्यरात्री 01.00 वा चे सुमारास श्रीरंग महादेव पवार, राजाराम महोदव पवार व तानाजी महादेव पवार या तीन बंधूनी एकत्रितपणे सहा खनी बांधलेल्या घरात शॉर्टसर्कीटने घराला आग लागून घरातील संसार उपयोगी सर्व साहित्यासह घरातील रोकड आणि घराच्या गोटयात बांधलेली 5 जनावरे ही जळून खाक झाली आहेत. या कुटुबांने घरास आग लागल्यानंतर आपला जीव धोक्यात घालून गोटयामध्ये बांधलेल्या 15 जनावरांपैकी 10 जनावरांना घराच्या बाहेर काढले. तर 5 जनावरांना ते वाचवू शकले नाहीत. यामध्ये या पवार कुटुबिंयाचे सुमारे 20 ते 21 लाख रुपयांचे नुकसान झाले असून सदरचे कुटुंबाचा संपुर्ण संसार यामुळे उध्वस्त झाला आहे. या कुटुंबियांना आधार देण्यासाठी तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी तात्काळ दुस-या दिवशी भेट दिली व या सर्व जळीताची पहाणी केली. सोबत महसूल विभाग व पोलीस विभागाचे अधिकारी होते. यावेळी महसूल विभागाने या जळीताचा केलेला पंचनामा आमदार शंभूराज देसाईंनी पाहिल्यानंतर झालेल्या प्रत्यक्ष् नुकसानीसंदर्भात तातडीने या कुटुंबाला धान्याचा पुरवठा करण्याच्या सुचना जागेवरुन प्रांताधिकारी व तहसिलदार यांना दिल्या. यावेळी शंभूराज युवा संघटनेचे ढेबेवाडी विभागातील पदाधिकारी उपस्थित होते त्यांनी व मत्रेवाडी ग्रामस्थांनी या जळीतग्रस्तांना आमदार देसाई यांच्या हस्ते आर्थिक मदत दिली.
त्यानंतर आमदार शंभूराज देसाई व स्व.शिवाजीराव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने या सहा कुटुंबियांना निवारा करण्याकरीता लागणा-या 6 पेटया पत्रा या विभागातील पदाधिकारी व शंभूराज युवा संघटनेचे पदाधिकारी यांना पाठवून देण्यात आला. दरम्यान पवार या जळीतग्रस्त कुटुंबियांनी घरातील वीजेचे मीटर हे नादुरुस्त असल्याने हा प्रकार घडला असल्याचे सांगितले असल्याने आमदार शंभूराज देसाई यांनी वीज वितरण कंपनीच्या संबधित अधिकारी यांना बोलावून ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागली असल्याने वीज वितरण कंपनीकडूनही या कुटुंबाला मदत होण्याचा प्रस्ताव व या कुंटुबांना घरकुल योजना मंजुर करणेसंदर्भातील प्रस्ताव गटविकास अधिकारी यांचेमार्फत तात्काळ शासनाकडे सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या असून मुख्यमंत्री सहाययता निधीतून जास्तीची मदत मिळावी याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी तातडीने मुख्यमंत्री यांना पत्रही दिले आहे येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेवून ही मदत तात्काळ करावी अशी मागणी ते करणार आहेत. आमदार शंभूराज देसाईंनी निवा-यासाठी दिलेल्या पत्र्याच्या पेटया व आर्थिक मदतीबद्दल पवार कुटुंबियांने आमदार शंभूराज देसाईंचे आभार मानले आहेत.
घोटील येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना आ. शंभूराज देसाईंकडून 6 पेटया पत्रा व आर्थिक मदत सुपुर्द
RELATED ARTICLES