सातारा: सातारा शहराला पाणी पुरवठा करणार्या शहापूर उपसा योजनेच्या फिल्टरेशन टाकीची आणि ऐतिहासिक कास पाणी पुरवठ्याच्या सांबरवाडी येथील फिल्टरेशन टाकीची स्वच्छता पाणीदार सभापती असा नावलैकिक झालेल्या सुहास राजेशिर्के यांनी केली. गुरुवारी जकातवाडी येथील फिल्टरेशन टाकीतील गाळ काढण्यात आला. सकाळी 11 वाजता या स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. केवळ सूचना न देता सभापती स्वतः गाळ काढण्याच्या कामाच्या ठिकाणी पोहचले. अंगावरील कपडयानिशी टाकीमध्ये उतरुन कर्मचार्यांच्या सोबत गाळ काढू लागले. सायंकाळपर्यंत तब्बल तीन फुट साचलेला गाळ निघेपर्यत ते टाकीत स्वच्छतेचे काम करत होते.
सातारा शहराला पाणी पुरवठा करणार्या शहापूर उपसा योजनेवर सातारकरांची तहान बर्यापैकी भागवली जाते. मात्र, या योजनेच्या जकातवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये असलेली टाकी स्वच्छ केली नव्हती. या टाकीची स्वच्छता करण्याबाबत नुकतीच बैठक पार पडली.
त्यामध्ये नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, अॅड. दत्ता बनकर, स्मिता घोडके आणि मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के यांनी टाकीच्या स्वच्छतेबाबत पाणी पुरवठा विभागात तशा सुचना दिल्या. प्रत्यक्ष कामाला सुरुवात गुरुवारी सकाळी 11 वाजता करण्यात आली. सभापती सुहास राजेशिर्के यांना हे काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. आपण पाणी पितो ते पाणी स्वच्छ असले पाहिजे. शहापूर योजनेच्या फिल्टरेशन टाकीमध्ये दर तासाला 323 क्युसेक्स लिटर्स पाणी शुध्द केले जाते. या टाकीमध्ये तीन फुट मातीचा थर साचला होता.
पाणी पुरवठा सभापतीं सुहास राजेशिर्के यांनी ही अवस्था बघून राहवले नाही. त्यांनी क्षणार्धात टाकीवरुन कर्मचार्यांना सुचना न करता अंगावरील कपडयांसह टाकीत उतरले.
कर्मचार्यांजवळील खोरे घेवून गाळ ढवळून स्वच्छ करु लागले. कर्मचार्यांनाही त्यांच्या या कामांमुळे हुरुप आला. सर्व कर्मचारी आणखी प्रेरणेने काम करु लागले. या कामाला दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागला असता. परंतु सभापती सुहास राजेशिर्के यांच्यामुळे हे काम सायंकाळी 5.30 वाजता ही टाकी पुर्णतः स्वच्छ करण्यात आली.
शेवट राहिलेला गाळावर फिरवण्यासाठी त्यांनीच हातात खराटा घेतला. हे काम करताना अंगातील सर्व कपडे भिजून चिंब झाले होते तसेच गाळाने भरले होते, याचेही भान त्यांना राहिले नव्हते. त्यांनी यापूर्वी ऐतिहासिक असलेल्या कास पाणीपुरवठ्याच्या सांबरवाडी येथील फिल्टरेशन टाकीची स्वच्छता ही केली होती. यावेळीही त्यांनी कर्मचा-यांना केवळ सूचना केल्या नाहीत तर प्रत्यक्ष काम केले. त्यांच्या या स्वभावानेच पालिकेत पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी आणि सातारकर नागरिक यांच्या तोंडी पाणीदार सभापती म्हणून त्यांचा उल्लेख होऊ लागला आहे.
हे तर माझं कामच आहे
या कामाबाबत बोलताना पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के म्हणाले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले आणि आमचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती मी सक्षमपणे निभावत आहे. कोणत्याही नागरिकांची कसलीही पाण्याची अडचण असले तर मी लगेच ती सोडवतो.
या टाकीचा गाळ काढल्याने शहापूर उपसा योजनेमध्ये पावसाचे गढूळ पाणी येते. ते पाणी शुध्द होण्यास आणखी मदत होणार आहे. या कामांमुळे मला सातारकरांची एक प्रकारे सेवाच केल्याचा आनंद मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.