सातारा : मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. सातारा येथील सुप्रसिध्द के. एस. डी. शानभाग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयाचा या वर्षीचा निकाल 100 टक्के लागला. गेल्या 17 वर्षे या परीक्षेचा या विद्यालयाचा निकाल 100 टक्के एवढा लागतो आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण 57 विद्यार्थ्यांपैकी29 विद्यार्थी विशेष प्राविण्य या श्रेणीत, 21 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 5 विद्यार्थी व्दितीय श्रेणीत व 2 विद्यार्थी पास श्रेणी असे उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयामध्ये प्रथम येण्याचा मान ओमकार सुतार या विद्यार्थ्यांने 94.20 टक्के गुण प्राप्त करुन मिळविला. सुब्रम्हण्यमन्या भट याने 93 टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय येण्याचा मान मिळविला. तसेच शाळेची हेड गर्ल असलेली वंदना पारीख हिने 90.20 टक्के गुण मिळवून शाळेमध्ये तृतीय येण्याचा मान मिळविला. इ. दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर भरघोस यश मिळविलेले आहे.
विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देत शालेय, जिल्हा, राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक क्रीडा विविविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संदापन केल्याबद्दल पालक व नागरिक यांनी आनंद व्यक्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष रमेश शानभाग, विश्वस्त उषा शानभाग, संचालिका आँचल घोरपडे, मुख्याध्यािपिका रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी,शिक्षक, पालक आदींनी अभिनंदन केले.