Friday, May 9, 2025
Homeठळक घडामोडीतरडगावचे सुपुत्र जवान निलेश चव्हाण शहीद

तरडगावचे सुपुत्र जवान निलेश चव्हाण शहीद

फलटण : तरडगावचे सुपुत्र  आर्मी जवान निलेश तुकाराम चव्हाण  वय 34 पंजाब येथील वठींड येथे शुक्रवार 17 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वा 35 मि. च्या दरम्यान  देशासाठी कर्तव्य  बजावत असताना शहिद झाले. यांचे पार्थिव देह तरडगाव येथे आणल्यानंतर तेथे दुपारनंतर आर्मी ,पोलीस ,फौजी व प्रांत, तहसीलदार पोलीस अधीक्षक, निरीक्षक या मान्यवरांच्या उपस्थित मानवंदना देण्यात येणार आहेत.
 जवान निलेश तुकाराम चव्हाण हे सन 2002 सालापासुन आर्मी मध्ये कार्यरत होते. 15 वर्षा च्या रिटायरमेंट नंतर 7/8 महिन्यापासून पुन्हा गनर हावलदार (भारतीय तोफाखाना, अटलरी) या पोस्टवर कार्यरत होते. त्यांच्या पश्चात वृध्द आई, वडील, पत्नी, 2 लहान मुले, भाऊ भावजय त्यांची मुले असा परिवार आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular