सातारा:सातारा तालुक्यातील आरफळ ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादी प्रणीत काळेश्वरी ग्रामविकास प्रनेलने सरपंचपदासह 9-2 अशा फरकाने विरोधी पॅनेलचा दारुण पराभव करुन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. शशिकांत शिंदे गटाने संयुक्तीकरित्या निवडणूकीत यश मिळवले. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सरपंच आणि सर्व सदस्यांचे अभिनंदन करुन गावाचा विकास हेच धेय ठेवून काम करा, असे आवाहन केले.
आरफळ ग्रामपंचायत निवडणूकीत आ. शिवेंद्रसिंरहाजे यांचे कट्टर समर्थक, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेंद्र पवार, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस युवराज पवार, 36 गाव अध्यक्ष संजय पवार, तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रामचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी प्रणीत काळेश्वरी ग्रामविकास पॅनेल आणि किसनवीर कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, माजी उपसभापती आप्पासाहेब पवार, वसंतराव साबळे, ज्ञानदेव साबळे यांच्या नेतृत्वाखालील आरफळ विकास आघाडी पॅनेलमध्ये सरळ लढत झाली. या लढतीत काळेश्वरी ग्रामविकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार मेघा माने यांच्यासह सदस्य भिमराव माने, वैभव पवार, कांचन कुंभार, उषा पवार, सुनिल पवार, वैशाली पवार, सुवर्णा पवार हे 150 ते 270 च्या फरकाने विजयी झाले तर, दोन उमेदवारांचा निसटत्या फरकाने पराभव झाला. सरपंचपदासह 9 पैकी 7 सदस्य विजयी झाल्याने राष्ट्रवादी प्रणीत काळेश्वरी ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता मिळवली.
नुतन सरपंच आणि सदस्यांचा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक महेंद्र पवार, युवराज पवार, संजय पवार, रामचंद्र पवार, शंकर फरास, रविंद्र पवार, अशोक पवार, सुनिल कासकर, नितीन साबळे, माजी सरपंच मोहन पवार, अश्विण पवार, भाऊ पवार, प्रवीण पवार, यशवंत पवार आदी मान्यवरांसह पॅनेलचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी विश्वासाने गावची सत्ता नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या हाती दिली आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी बांधिल रहावे. गावात विविध विकासकामे करुन ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा. निवडणूक ही पाच वर्षातून एकदा होते. त्यामुळे निवडणूकीपुरते राजकरण मर्यादीत ठेवून नवनिर्वाचित सरपंच आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी गावाचा सर्वांगिण विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.