सातारा : उद्योगात पर्यावरणाशी मैत्र राखणार्या कार्य पद्धती अमलात आणल्या बद्दल खुटाळे इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेडलाभारतीय उद्योग महासंघाच्या (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज) वतीने दिला जाणारा ग्रीनको प्लॅटिनम हा सर्वोच्य दर्जा हैदराबाद येथे झालेल्या सींआयआयच्या पाचव्या ग्रीनको समीत प्रसंगी देण्यात आला. प्राईम मिनिस्टर्स कौन्सिल ऑफ क्लायमेट चेंजचे मेंबर व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञ नितीन देसाईच्या हस्ते कंपनीचे अध्यक्ष शिरीष खुटाळे व संचालक शुभांगी खुटाळे यांनी तो स्वीकारला.
या प्रसंगी बोलताना देसाई म्हणाले ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग बरोबर ग्रीन कन्झुमर्स ,ग्रीन फायनान्स व ग्रीन गव्हर्नन्स एकत्र आले तर पर्यावरण चळवळीस बळ मिळेल.स्पर्धात्मकता कंपन्यांना कृती करायला भाग पाडत असून ही प्रक्रिया त्यांना सहजासहजी पर्यावरणाच्या नियम चौकटीत राहण्यास समर्थ बनवीत आहे. देशात अलीकडेच एलईडी दिवे वितरण हे या चौघांचे जवळ येण्याचे उत्तम उदाहरण आहे.
गोदरेज उद्योग समुहाचे प्रमुख व सीआयआय सोहराब गोदरेज ग्रीन बिझनेस सेंटर हैदराबादचे अध्यक्ष जमशीद गोदरेज या वेळी म्हणाले पर्यावरण अन आर्थिक विकास हे परस्पर विरोधी नसून हातात हात घालून जातात. उद्योगांनी त्यांच्या भागधारकांशी पर्यावरणा बाबत अधिक खुले व पारदर्शक असायला हवे. 2020 साला पर्यंत भारतीय उद्योग महासंघ (सी आय आय) 1000 कंपन्यांनाग्रीनको रेटेड दर्जा देण्याचे उद्दिष्ट गाठेल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. आज 200 कंपन्यां रेटिंग साठी प्रयत्न करीत आहेत त्यात मोठ्या 78 ग्रीनको रेटेड कंपन्या आहेत.
ग्रीनको समीटचे अध्यक्ष व कमिन्सचे वरिष्ठ संचालक प्रदीप भार्गव यांनी उद्योगात पर्यावरण धोरणे राबविताना नुसता पेबॅकचा विचार न करता पे फ्रंटचा विचार करून हरित धोरण राबवितानाच पर्यावरणाशी मैत्र राखणार्या वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी काम करण्याची गरज व्यक्त केली.
सीआयआय मोठ्या उद्योगासाठी ग्रीनको रेटिंग देत असते. अलीकडे त्यांनी लघु व मध्यम उद्योगासाठी ग्रीनको रेटिंग सिस्टीम तयार केली.त्या मध्ये देशात प्रथमच खुटाळे इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड,सातारा, श्री अष्ट विनायक ग्लास प्रा ली. खंडाळा व अजय पॉली केम प्रा.ली.विंग या3 एसएमई सेक्टर मधील कंपन्यानी भाग घेतला वग्रीनको रेटिंग प्राप्त केले.ज्या30 लहान मोठ्या कंपन्यांना रेटिंग देण्यात आले पैकी खुटाळे इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेडपहिल्याच प्रयत्नात प्लॅटीनम रेटिंग मिळविणारी देशातील अग्रेसर कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे या तिन्ही कंपन्या सातारा जिल्ह्यातील असून गोदरेज अप्लायन्सेस शिरवळच्या प्रमुख पुरवठादार आहेत.
पर्यावरणाशी मैत्र राखण्याच्या या प्रवासात खुटाळे इंजिनिअरींगनेवीज ,पाणी,कच्चा माल या नैसर्गिक स्त्रोतांचे जतन करण्यासाठी अनेक उपाय योजना राबविल्या अन कार्यपद्द्तीत सुधारणा केल्या.ईनर्जी ऑडीट करून विविध प्रोडक्शन लाईन्ससाठी वेगळे वीज मीटर्स बसविले, जास्त अश्वशक्ती असलेल्या विजेच्या मोटर्सना व्हीएफडी बसविल्या, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरबदलून कमी वीज वापरणारा स्क्रु कॉम्प्रेसर बसविण्यात आला.सातार्यात पहिलीच 30 केडब्लू कपॅसिटीची रुफ टॉप सोलर पॉवर पीव्ही ग्रीड इंटर अॅकटीव्ह सिस्टीम उभारली.अशा प्रकारे शाश्वत उर्जा स्त्रोतांचाअधिकवापर करून 2020 पर्यंत 100% हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ठ ठेवलेआहे. पाण्याच्या बचती साठी प्रक्रियेत वापरलेल्या पाण्यावरएफ्लूअंट ट्रीटमेंट प्लांट (एढझ)मध्ये पुनर्प्रक्रिया करून पुनर्वापर,प्रक्रीये साठी रेन वाटर हार्वेस्टिंग, भूजल पातळी वाढण्यासाठी मॅजिक पिट, सभोवतालच्यागार्डनमध्ये ठिबक सिंचन अन कामगार कर्मचार्यांत जागरूकता वाढवून वीज, रॉ मटेरीअल अन पाण्याची बचत केली आहे.सीआयआय ग्रीन बिझिनेस सेंटर हैदराबादच्या मदतीने कंपनीने आपल्या उद्योगात निर्माण होणारया कार्बन उत्सर्जनाचा (ग्रीन हॉउस गॅस इमिशन ) अभ्यास केला .त्या अनुषंगाने हरित उद्योग धोरण अन ग्रीन सप्लाय चेन बनविण्यात आले. मिल्क रन पद्धत राबविल्या मुळे ट्रान्सपोर्ट मध्ये होणारे अति उत्सर्जन कमी झाले.रॉ मटेरीअल कट टू साईझ, लेंग्थ ,कॉईल फॉर्म मध्ये मागवून , टूल्स मध्ये सुयोग्य बदल करून त्याची नासाडी कमी करण्यात यश मिळाले.उद्योगातउर्जा, पाणी,धातू या नैसर्गिक स्रोतांचे जतन व सुयोग्य वापर करण्या साठी सतत सुधारणा कायझेन तत्व राबविले जातेय. उत्पादनात तयार होणारया औद्योगिक कचरयाची योग्य नोंद व नियंत्रण करण्यारया सर्व कार्य पद्धतींचा येथे अवलंब केला जातो.अत्युच्च उर्जा बचत करणार्या प्रक्रिया , वस्तू व तंत्रज्ञानाचा वापर करणारी तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्यासाठी कामगार कर्मच्यारयानी केलेल्या प्रयत्नांची , घेतलेल्या परिश्रमांची योग्य दखल घेऊनबक्षीस देणारी व कायदेशीर बाबींच्या चौकटीत राहून कार्य करणारी ही कंपनी आहे. पृथ्वी आपल्या पूर्वजां कडून वारसा हक्काने मिळाली नसून ती आपल्याला भावी पिढी कडून उधारमिळाली आहे,ती मानवाची भूक भागवू शकेल पण हाव नाहीआणिइथेआपण केलेली घाण आपणच काढायला पाहिजे, बदलाची सुरुवात स्वतः पासून हवी यामहात्मा गांधींच्या पर्यावरणा बद्दलच्या विचारांचाप्रभाव, पर्यावरणाप्रती असलेली काळजी, गोदरेजसारख्या पर्यावरणाप्रती जागरूक ग्राहका कडून मिळालेली प्रेरणा अन आयएसओ 14001:2004 या प्रयावरण प्रमाणपत्राची पूर्तता या सर्व गोष्टी हरित सुधारणा करताना महत्वाच्या ठरल्या.
सुधारणा ही एक अखंड प्रक्रिया आहे ती सुरु आहेच या प्रत्येक सुधारणांच्या मागे संपूर्ण टीम असते त्यामुळे हे यश त्यांचेच असे शिरीष खुटाळे अभिमानाने सांगतात.