महाबळेश्वर (संजय दस्तुरे ,महाबळेश्वर): महाबळेश्वर पालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. सुमारे ८० टक्के मतदान झाले .मतदान प्रकिया शांततेने पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. येथील माखारीया हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान इलेकट्रोनीक मशीन सुरुवातीला योग्य पद्धतीने काम करीत नव्हती त्यामुळे तेथे एक तास उशिरा मतदान सुरु झाले व त्या मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ शेवटी एक तास वाढविण्यात आली सायंकाळची साडे सहा पर्यंत येथे मतदान सुरु होते . सकाळी सुरुवातीला अत्यंत संथगतीने मतदान सुरु होते मात्र त्याच वेग दुपारी वाढला शेवटच्या टप्प्यात तर येथील बहुत सार्या मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाल्या. निवडणूक प्रक्रियेची चोख व्यवस्था व सुसज्ज पोलीस यंत्रणा यामुळे मतदान शांततेने पार पडले .या वर्षी नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट पद्धतीने असल्याने सर्वाच्यात तो ओत्सुक्याचा विषय होता .हे पद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित होते व यासाठी येथे पाच उमेदवार रिंगणात होते .त्यातील लक्षवेधी असलेल्या लोकमित्र जनसेवा आघाडीच्या उमेदवार सौ.इंदु साळुंखे यांनी माखारीया हायस्कूल मतदान केद्रावर आपला हक्क बजाविला तर आमदार गटाच्या सौ.स्वप्नाली शिंदे यांनी कोळी आळी समाज मंदिरात मतदान केले .तर येथील अंध उद्योजक भावेश भाटीया यांनी आपल्या पत्नी सौ.नीता भाटीया यांच्या मदतीने व ब्रेल लिपीच्या सहाय्याने मतदानाचा हक्क अंजुमन हायस्कूल मतदान केंद्रावर बजावला .तर काही जेष्ठ वयस्कर नागरिकांनी हि आपल्या कुटुंबियांच्या मदतीने हक्क बजाविला

