महाबळेश्वर : महाबळेश्वर पंचायत समिती मध्ये जिल्हा परिषदेचे दोन गट व चार गण पैकी भिलार गणात सौ.रुपाली राजपुरे, मेतगुताड गणात संजूबाबा गायकवाड, तळदेव गणात सौ.अंजना कदम (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस ) व कुंभरोशी गणात शिवसेनेचे आनंदा उतेकर असे चारजण निवडून आले होते.
दरम्यान या वेळचे सभापतिपद हे खुल्या गटासाठी होते. आज सभापती व उप सभापती पदासाठीची निवड होती त्यानुसार सभापती पदासाठी भिलार गणातील सौ.रुपाली राजपुरे यांचा एकच अर्ज भरला गेला तर उप सभापतीपदासाठी तळदेव गणात सौ.अंजना सुभाष कदम (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सभपती पदासाठी सौ. राजपुरे व उपसभापती पदासाठी सौ.कदम बिन विरोध निवडल्याचे घोषित केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे, गट विकासाधिकारी दिलीप शिंदे, प.स. सदस्य संजूबाबा गायकवाड, शिवसेनेचे आनंद उतेकर , राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते समाज भूषण बाळासाहेब भिलारे, माजी सभापती संजय जंगम वकील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबुदादा सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर नूतन सभापती सौ.रुपाली राजूशेठ राजपुरे व उप सभापती पदी सौ.अंजना सुभाष कदम याचे अभिनंदन व सत्कार बाळासाहेब भिलारे यांच्या हस्ते करण्यात आला. महाबळेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गट तट, पक्ष आदी भेद भाव न करता सर्वाना बरोबर घेऊनकारभार करू अशी ग्वाही नूतन सभापती सौ.रुपाली राजपुरे यांनी दिली. यावेळी बाळासाहेब भिलारे, संजूबाबा गायकवाड, राजूशेठ राजपुरे, बाबुदादा सकपाळ आदीची अभिनंदन करणारी मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यानंतर नूतन सभापती सौ. रुपाली राजपुरे व उप सभापती सौअंजना कदम यांच्या चाहत्यांनी भव्य मिरवणूक काढली.
महाबळेश्वरात राष्ट्रवादीचे महीलाराज
RELATED ARTICLES