सातारा : आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक वॉर्डमधून इच्छुकांची संख्या जास्त आहे. जी माझ्यापुढे समस्या आहे तीच समस्या ग्रेट शिवेंद्रराजेंच्यापुढे आहे. त्यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल आणि जरी आमने सामने आलो तरी नडत नाही. प्रत्येक वॉर्डमध्ये लोकसेवक योग्य उमेदवार दिले नाही तर लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट भूमिका खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नगरपालिकेत मांडली.
सातारा पालिकेच्या सभागृहात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे म्हणाले, शहरातील रहिवाशांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याचा सातारा विकास आघाडीचा अजेंडा राहिला आहे. पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट, पावसाळयात गटारे तुंबुने याचा शोध घेतला असून बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. राहिलेली कामे सुध्दा पुर्ण करणार आहे. शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या उड्डाणपुलाचे कामही लवकरच सुरु होणार आहे. भविष्याचा विचार करता शाहूनगर मधून कुरणेश्वरच्या येथे बोगदा काढण्याचे नियोजन असून त्यामुळे वाढणा-या शहराची व्यवस्था होईल. कास धरणाची उंची वाढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून ग्रीन ट्रॅब्युनल पुढे 19 तारीख आहे. त्याचा निर्णय झाल्यानंतर काम होईल त्यामुळे 2020 पर्यंत सातारकरांना पुरेशा प्रमाणात ग्रॅव्हिटीने पिण्याचे पाणी मिळणार आहे. आगामी पालिका निवडणुकीत मनोमिलन राहणार का याबाबत विचारले असता प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुकांची संख्या मोठया प्रमाणात असून जी मला समस्या आहे तीच समस्या ग्रेट शिवेंद्रसिंहराजेपुढे आहे त्यातून मार्ग कसा काढता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि जरी आमने- सामने आलो तर नडत नाही.
प्रत्येक वॉर्डमध्ये लोकसेवक योग्य उमेदवार दिले नाहीत तर लोकांच्या मतावर निर्णय घेतला जाईल. थेट नगराध्यक्षपद असल्याने उमेदवार कोण असणार याबाबत विचारले असता प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे या मताची मी आहे. नगरसेवक, नगरसेविका प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु जो ख-या अर्थाने प्रामाणिकपणे सेवा करेल. सातारा शहराचा नावलौकिक वाढवेल अशा व्यक्तीला संधी देणार आहे. बरेच लोकांना मी सांगून ठेवले आहे परंतु त्यांना तुम्हीच एक नाव सुचवा असे सांगितले आहे. नगराध्यक्षपदासाठी राजघराण्यातील व्यक्तीच्या नावाबाबत कोणतीही चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोमिलनाच्या दहा वर्षाच्या कारभारावर समाधानी आहात का असे विचारले असता त्यांना समाधानी नाही असे उत्तर दिले. ज्या पध्दतीने कारभार चालला पाहिजे होता त्या पध्दतीने तो चालला नाही. मनोमिलन असेल तरी नगरविकास आघाडीतील काही सदस्यांची वर्तुणक चांगली नाही. ते प्रशासनाशी आणि लोकांशी उध्दटपणे वागत आहेत. ते मला मान्य नाही. मी कुणाशी उध्दटपणे वागत नाही त्यामुळे कुणी वागलेले मी खपवून घेणार नाही. याबाबात शिवेंद्रराजेंशी चर्चा केली का असे विचारले असता चर्चा कोणाशी करायची हा प्रश्न आहे. ते रामराजेंचे नेतृत्व मानतात त्यामुळे चर्चा त्यांच्याशी का रामराजेंशी करायची असा प्रश्न आहे. सातारा जिल्हया दुस-या जिल्हयातील फटखळ माणसाच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न होत आहे तो मी कसा सहन करणार. प्रश्न पक्षाचा नाही तर जिल्हयाच्या अस्मितेचा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नियोजनाचा अभाव दिसून येत असून पाणीपुरवठया मंत्र्यांनी काय केले माहिती नाही परंतु मुख्याधिका-यांना मी ते काम जीवन प्राधिकरणाकडून काढून घेऊन पालिकेने स्वतः करावे अशा सूचना केल्या आहेत. एवढया वर्षांपासून मी तेच सांगत होतो माझ्या पध्दतीने म्हणजे लोकांच्या हिताचे काम झाले असते तर आज ही प्रश्न विचारायची वेळ आली नसती. मी कोणत्याही परिस्थिती गैरकारभार खपवून घेणार नाही. मुलीवर बलात्कार झालेला मला खपत नाही तो अक्षम्य असा अपराध आहे. मी माझे मत परखडपणे व्यक्त करत असतो. आजपर्यंत शरद पवारांनी ज्याप्रमाणे राजकारण केले त्यासाठी त्यांना सलाम परंतु पक्षाचे पुढे काय होणार हे कुणालाच माहित नाही. लोकांची सेवा करणे हेच माझे ध्येय असून माझ्यापेक्षा जास्त सेवा कुणी करणारा दाखवून द्या. पुढील निवडणुकीत मी त्याचा प्रमुख प्रचारक म्हणून काम करेन असेही खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले.